Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं सत्य

Biryani And Watermelon Combination : बिर्याणी आणि कलिंगडाचे सेवन केल्याने मुंबईत कुटुंबातील चार सदस्यांनी आपला जीव गमावला आहे. चला तज्ञांकडून हे काॅम्बिनेशन खरंच धोकादायक आहे की नाही ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 04:57 PM
चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? तज्ञांनी सांगितलं खरं सत्य

चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? तज्ञांनी सांगितलं खरं सत्य

Follow Us
Follow Us:
  • तज्ज्ञांच्या मते काही अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकते.
  • खराब किंवा साठवलेले अन्न खाल्ल्याने विषबाधेचा धोका वाढू शकते.
  • जेवणानंतर कोणते पदार्थ कधी खावेत याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबईतील विषबाधेच्या घटनेने सध्या सर्वत्र गोंधळ माजवला आहे. रात्री बिर्याणी आणि कलिंगडाचे सेवन केल्याने रोतोरात संपूर्ण कुटुंबाने आपला जीव गमावला. माहितीनुसार, २५ एप्रिल २०२६ रोजी ही घटना घडली ज्यात चार जणांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, विषबाधेने त्यांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर आता देशभरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून बिर्याणी आणि कलिंगडाच्या सेवनाबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चला तर मग तज्ञांचे यावर काय मत आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

ओव्हरथिंकिंग थांबवा, नाहीतर मेटाबॉलिजम होईल स्लो; मनातले विचार थांबवण्यासाठी तज्ञांनी सांगितले 4 पर्याय

नोएडा कैलाश हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा शंकर शर्मा यांनी सांगितले की, कधीकधी खराब झालेले कलिंगड किंवा खराब झालेली बिर्याणी खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. तथापि, बिर्याणीनंतर लगेच टरबूज खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होईलच याची १००% खात्री नाही. बिर्याणीनंतर लगेचच कलिंगड खाल्ल्याने पोट बिघडू शकते. तसेच यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो.

यथार्थ हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कपिल शर्मा यांनी सांगितले की, बिर्याणी आणि कलिंगड दोन्हीही पचवण्याची क्रिया काहीशी वेगळी असते. जास्त प्रमाणात जर यांचे सेवन केले जर यामुळे गॅस, पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तथापि, बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो हा दावा खोटा असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. हे दोन्ही पदार्थ खाल्ल्याने कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही जी मृत्यू घडवून आणेल. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने जर कुणाचा मृत्यू होत असेल तर त्यामागे लिव्हर शॉक, अन्न विषबाधा किंवा ॲलर्जी सारखी इतर कारणे कारणीभूत ठरु शकतात. याशिवाय खराब झालेले अन्न खाल्ल्यानेही ही समस्या निर्माण होऊ शकते.

फोर्टिस हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भानू मिश्रा यांनी सांगितले की, कलिंगड हा एक हलका पदार्थ मानला जातो. दुसरीकडे बिर्याणी हा एक जड पदार्थ मानला जातो. बिर्याणी पचायला शरीराला ४ ते ५ तास लागतात, तर टरबूज पचायला २० ते ३० मिनिटे लागतात. यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोट बिघडू शकते. परंतु या फूड काॅम्बिनेशनमुळे मृत्यू होत नाही. बिर्याणी खाल्ल्याच्या ४-५ तासांनंतर कलिंगडाचे सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. पण कलिंगडाचे हे सेवन नेहमी मर्यादित प्रमाणातच करा अन्यथा यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

या गोष्टी लक्षात ठेवा

  • पोटभर जेवण केल्यानंतर कलिंगडाचे लगेच सेवन करु नका.
  • जेवणाच्या काही तासांनंतर कलिंगड खा.
  • कापलेले कलिंगड फार काळ बाहेर ठेवू नका.
  • कापलेले कलिंगड लगेच खाऊन टाका ते फ्रिजमध्येही जास्त काळ ठेवू नका.
  • कलिंगड नेहमी ताजे असतानाच त्याचे सेवन करा.
  • कलिंगड खराब झाल्यासारखे वाटत असल्याच याचे सेवन टाळा.

Web Title: Mumbai food poisoning case biryani watermelon experts advice safe eating tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • biryani
  • Food Poison
  • lifestyle news
  • Watermelon Market

संबंधित बातम्या

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
1

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
2

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
3

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
4

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.