नागपंचमीला बनवा पौष्टिक गव्हाची खीर
श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. यंदाच्या वर्षी 9 ऑगस्टला नागपंचमी आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. तसेच अनेक महिला उपवास सुद्धा करतात. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळीच लगबग असते. सर्व महिला नटूनथटून श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिव मूठ वाहण्यासाठी शंकराच्या मंदिरात जातात. तसेच नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड, गव्हाची खीर, पातोळ्या इत्यादी गोडाचे अनेक पदार्थ बनवले जातात. बदलत्या ऋतूनुसार आहारात सुद्धा बदल केला जातो. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर बनवली जाते. गव्हाची खीर हा पारंपरिक पदार्थ असून गाव खेड्यात सर्वच ठिकाणी बनवला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गव्हाची खीर कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत. यंदाच्या नागपंचमीला गव्हाची खीर नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नागपंचमीला बनवा खास कोकणी हळदीच्या पानातील पातोळ्या, रेसिपी आहे सोपी