मुंबईतील 'या' मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला
संपूर्ण देशभरात नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. कुठे गरबाचे कार्यक्रम रंगले आहेत. तर कुठे देवाचा जागर केला जात आहे. नवरात्रीनिमित महाराष्ट्रातील देवीची मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच अनेक मंडळ देखील नवरात्रीच्या माध्यमातून देवीचा जागर करत आहे. असेच एक मंडळ म्हणजे दहिसर येथील जीएसबी मंडळ.
खरंतर, नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र हीच रूपं तुम्हाला एकाच देवीच्या मूर्तीत दिसली तर? हो हे शक्य आहे. मुंबईतील दहिसर बोरिवली येथील G.S.B. Sabha मंडळ गेल्या 18 वर्षांपासून एकाच देवीच्या मूर्तीतून भाविकांना तिच्या विविध रूपांचे दर्शन घडवत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
CML उपचारांच्या उद्दिष्टांमध्ये बदल, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचे पालटले स्वरूप; कसे जाणून घ्या
जिथे अनेक मंडळाच्या देवींचे दर्शन घेताना आपल्याला एकाच देवीची मूर्ती नऊ दिवस पाहायला मिळते, तिथेच दहिसर बोरिवली येथील जीएसबी शाखेकडून यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीचे नऊ नाही तर 11 रूपं दाखवण्यात येणार आहे, तेही एकाच मूर्तीच्या माध्यमातून. हे मंडळ, गेल्या 18 वर्षांपासून नवरात्री साजरा करत आहे. देवीचे हे विविध रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांना देवीचे 9 नाही 11 रूपं पाहायला मिळणार आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.
वाराणसी येथील श्री काशी मठ संस्थांचे 20 वे मठाधिपती, परम पूज्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी यांच्या हस्ते 2008 साली जी.एस.बी. सभा दहिसर-बोरिवली शाखेने नवरात्री उत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर, 2011 मध्ये, याच परम पूज्य स्वामींच्या हस्ते देवीला सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला.