कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे उपाय (फोटो- istockphoto)
HairFall News: सध्या आपले जीवन हे धावपळीचे बनले आहे. आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्या आहाराच्या वेळा नीट पाळल्या जात नाहीत. त्यामुलेया सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर , आरोग्यावर होत असतो. पोषक तत्वे शरीरात न गेल्याने केस गळणे, पांढरे होणे आणि अन्य काही आजार होण्याची शक्यता असते. बदलती आणि धावपळीची लाइफस्टाइल यामुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होत आहेत. या समस्येने अनेकजण त्रासलेले आहेत. चला तर मग आज आपण काही घरगुती उपाय पाहूयात, ज्यामुळे केस पांढरे होण्याचे, गळण्याचे प्रमाण कमी होईल.
केसांमुळे आपले सौंदर्य वाढते असे म्हटले जाते. मात्र हल्लीच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच लोकांचे केस सफेद होताना दिसून येतात. कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे केसांना आवश्यक तत्वे मिळत नसल्याचे लक्षण आहे. मात्र काही घरगुती उपायांमुळे केस काळे, दाट करू शकता. ते घरगुती उपाय कोणते आहेत, त्याबद्दल आपण जाऊन घेऊयात.
कांद्याचा रस: पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस हा एक घरगुती उपाय करू शकता. कांद्याच्या रसामध्ये असलेले एंजाइम केसांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे केसांमधील मेलेलीन वाढवून पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी मदत करते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावावा. त्यानंतर ३० मिनिटांनी केस शाम्पू लावून स्वच्छ पाण्याने धुवावेत.
नारळाचे तेल व कडीपत्ता: पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी कांद्याच्या रसाऐवजी तुम्ही कडीपत्ता आणि नारळाचे तेल देखील वापरू शकता. कडिपत्त्यामध्ये असणारे अँटीऑक्साइड्स आणि व्हिटॅमिन केसांना पांढरे होण्यापासून बचाव करते. कडीपत्ता नारळाच्या तेलात बुडवून ते तेल गॅसवर उकळावे. गार झाल्यावर केसांना लावावे. ते रात्रभर केसांना लावून झोपावे.
मेहंदी आणि कॉफीचा पॅक: कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी तुम्ही मेहेंदी आणि कॉफीचा पॅक देखील वापरू शकतो. मेहेंदी पावडरमध्ये उकलली कॉफी मिसळावी. त्याची पेस्ट करून केसांना लावावी. दोन तासांनी केस धुवावेत.
आवळा आणि नारळाचे तेल: तुम्ही तुमचे केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळ्याचे व नारळाचे तेल केसांना लावू शकता. आवळा केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. आवळा आणि नारळाचे तेल एकत्रितपणे केसांना लावल्यास अधिक फायदा होतो. आवळा पावडर नारळाच्या तेलात मिसळून उकळावे. त्यानंतर मिश्रण थंड झाले की आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही केसांना लावू शकता.