फोटो सौजन्य: iStock
सध्या केमिकल फॅक्टरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या फॅक्टरीज आपल्याला जास्तकरून शहरापासून लांब ठिकाणी स्थित असतात. तसेच केमिकल फॅक्टरीजमध्ये काम करताना अनेक प्रकारचे धोके असतात. यात काम करणाऱ्या लोकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. या आजारांमुळे त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच कारखान्यांमध्ये काम करताना सुरक्षा उपायांचा अवलंब केला पाहिजे.
मात्र, तरीही केमिकल्सपासून स्वतःला वाचवणे इतके सोपे नाही. याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो. अशा परिस्थितीत, केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणे धोकादायक का आहे, यामुळे कामगारांना कोणते आजार होऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया.
हे देखील वाचा: महिलांमधील ऑटोइम्यून आजार, 80% महिलांना घेरलेय जाणून घ्या कसे
केमिकल फॅक्टरीत वापरलेली केमिकल विषारी आणि धोकादायक असू शकतात, जे कामगारांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. तसेच यामुळे आपल्याला अनेक आजार जडू शकतात.
केमिकल फॅक्टरीमधून निघणारा धूर आणि वायूमुळे वायू प्रदूषण तर होतेच, पण यामुळे फुफ्फुसाचे आजार सुद्धा होऊ शकतात. यामुळे कॅन्सरही होऊ शकतो.
केमिकल फॅक्टरीत नेहमीच आग आणि स्फोट होण्याचा धोका असतो, ज्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नेहमीच सुरक्षिततेचे उपाय अवलंबले जातात. इथे काम करणाऱ्या लोकांचे कपडेही वेगळे असतात.
रासायनिक कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे त्वचा आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, ॲलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच डोळ्यांना गंभीर नुकसान देखील होऊ शकते.
केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांचा धोका जास्त असतो. योग्य काळजी न घेतल्यास, अनेक जण या आजारांना बळी पडू शकतात, जे भविष्यात घातक ठरू शकतात.
कॅन्सर: केमिकल फॅक्टरीत वापरल्या जाणाऱ्या अनेक रसायनांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता बळावू शकते.
फुफ्फुसाचे आजार: केमिकल फॅक्टरीत निर्माण होणारी धूळ आणि वायूंमुळे फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.
त्वचा रोग: केमिकल फॅक्टरीत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात.
न्यूरोलॉजिकल रोग: केमिकल फॅक्टरीत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे न्यूरोलॉजिकल रोग होऊ शकतात.
हृदयरोग: केमिकल फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांना हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो.






