पित्तदोषाची होईल कायमची दूर! रिकाम्या पोटी नियमित खा 'ही' हिरवी पाने
बदललेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, मानसिक तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. सतत जंकफूड, चहा कॉफी, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन इत्यादींमुळे शरीरात पित्त वाढू लागते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येणे, अपचन किंवा मळमळ, उलट्या होण्याची जास्त शक्यता असते. काहींच्या शरीरात पित्तदोष असल्यामुळे त्यांना कोणत्याही पदार्थ खाल्यानंतर लगेच ऍसिडीटी किंवा अपचनाचा त्रास होऊ लागतो. सतत होणाऱ्या ऍसिडिटी आणि अपचनामुळे पोटात वायू तयार होतो.(फोटो सौजन्य – pinterest)
पावसाळ्यात होणारे Vaginal Infections कसे टाळाल? सोप्या टिप्सचा करा वापर
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. या विषारी घटकांमुळे पोट आणि आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या उद्भवू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी कोणती पाने चावून खावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पानांचे सेवन केल्यामुळे पोटात थंडावा सुद्धा टिकून राहील. तसेच शरीर कायम निरोगी राहील.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पुदिन्याची ५ किंवा ६ पाने नियमित चावून खाल्यास पोटात वाढलेली ऍसिडिटी कमी होईल आणि शरीर कायमच थंड राहील. पुदिन्याची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. या पानांचे सेवन सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि डोके दुखीच्या त्रासापासून सुटका मिळते. पुदिन्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. ही पाने पचनक्रिया कायमच निरोगी ठेवतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पुदिन्याची पाने प्रभावी ठरतात. याशिवाय तुम्ही पुदिन्याच्या पानांचा रस सुद्धा पिऊ शकता.
पुदिन्याच्या पानांचे सेवन करताना चणे खाण्याऐवजी तुम्ही भीमसेन कापूरचे सेवन करू शकता. यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होईल आणि आराम मिळेल. याशिवाय पुदिन्याची पाने खाताना त्यासोबत खडीसाखर खाल्यास पित्ताचा त्रास उद्भवणार नाही. याशिवाय सतत येणारे आंबट ढेकर कमी होतील. ऍसिडिटी, अपचन, गॅस किंवा पोटासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे.
ऍसिडिटी म्हणजे काय?
ऍसिडिटी म्हणजे पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत येणे, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होते.
ऍसिडिटीची सामान्य लक्षणे कोणती?
ऍसिडिटीची सामान्य लक्षणे म्हणजे छातीत जळजळ, आंबट किंवा कडवट चवीचे द्रव घशात येणे, अपचन, गिळण्यास त्रास होणे, आणि घसा खवखवणे किंवा कर्कश वाटणे.
ऍसिडिटीवर घरगुती उपाय काय आहेत?
ऍसिडिटीवर अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत, जसे की जेवणानंतर बडीशेप खाणे, आल्याचा चहा पिणे, बेकिंग सोडा आणि कोमट पाण्याचे मिश्रण पिणे, तसेच थंड दूध पिणे.