दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कॉफी प्यायला खूप जास्त आवडते. सकाळी उठल्यानंतर सुरुवात कॉफीने होते. पण उपाशी पोटी कॅफिन युक्त पेयांचे सेवन करणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला दुधाचा अजिबात वापर न करता कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. कॅफेमध्ये गेल्यानंतर कायमच सगळ्यात आधी कोल्ड कॉफी ऑर्डर केली जाते. पण कायमच विकतची कॉफी आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेली कोल्ड कॉफी प्यावी. यामुळे मुलांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचणार नाही. सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाला काहींना काही स्पेशल पदार्थ हवा असतो. अशावेळी कोल्ड कॉफी बनवून प्यावी. ही कॉफी बनवताना बदामाचा वापर केल्यास कॉफीचे टेक्सर स्मूथ होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






