राधिका मर्चंट हळदी लूक
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा राधिका मर्चंट हिच्यासोबत होणार आहे. बहुचर्चित विवाह सोहळ्याची सगळीच लोक आतुरतेने वाट पाहत आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे काही दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री वेडिंग पार पडले. त्यानंतर इटलीमध्ये क्रूजवर देखील त्यांचे प्री वेडिंग आयोजित करण्यात आले होते. दोन प्री वेडिंग सोहळ्यानंतर अखेर 12 जुलै ला अनंत राधिका यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या ग्रँड वेडिंग सोहळ्यासाठी जोरदार तयार करण्यात आली आहे.तसेच लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून 8 जुलै ला अनंत राधिका यांचा हळदी समारंभ पार पडला. (फोटो सौजन्य-instagram)
राधिका मर्चंट हळदी लूक
अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती, सेलिब्रिटी, पाहुणे मंडळी इत्यादी अनेकांना निमंत्रण देण्यात आले आहे.शाही विवाह सोहळ्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या लूकचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. नुकतेच राधिका मर्चंट हीच हळदी सोहळ्यातील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिने घातलेल्या लेहंगा आणि फुलांचा दुपट्टा चर्चचा विषय बनला आहे.
हळदी सोहळ्यासाठी राधिकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. त्यावर तिने ताज्या फुलांचा दुपट्टा घेतला आहे. मोगऱ्याच्या फुलांनी तयार करण्यात आलेल्या फ्लॉवर स्कार्फ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये वापरण्यात आलेली फुले मोगऱ्याची आहेत.तसेच दुपट्याच्या किनारी भागात पिवळ्या झेंडूची फुले लावण्यात आली आहेत. राधिकाच्या लेहंगा डिझायनर अनामिका खन्ना यांनी तयार केला आहे. सेलिब्रिटी स्टायलिस्ट रिया कपूरच्या टीमने राधिकाच्या संपूर्ण स्टायलिंगवर काम केले आहे.
राधिका मर्चंट हळदी लूक
हळदी सोहळ्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या दुपट्यासोबतच फुलांचे दागिने देखील तयार करण्यात आले आहेत. राधिकाने तिच्या हळदी लूकमध्ये फुलांचा मणी असलेला चोकर आणि लांब हार घातला असून त्यावर मॅचिंग कानातले घातले आहेत.या लूकवर राधिकाचा मेकअप अगदी लाइट ब्लश, साधी छोटी लाल बिंदी, आयलायनर आणि न्यूड शेडची लिपस्टिक असा करण्यात आला होता. तसेच राधिकाने हातामध्ये फुलांच्या बांगड्या घातल्या आहेत.