दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारत्मकतेने करण्यासाठी प्रियजनांना पाठवा 'या' शुभेच्छा
सकाळी उठल्यानंतर दिवसाची आनंद आणि उत्साहाने व्हावी, असे प्रत्येकालाच कायम वाटत असते. सकाळी उठल्यानंतर काहींना व्यायाम, प्राणायाम करण्याची सवय असते तर काहींना घरातील लोकांसोबतच छान गप्पा मारून आनंद मिळतो. सकाळी उठल्यानंतर घरातील व्यक्तींनी किंवा मित्रपरिवारातील लोकांनी दिलेल्या शुभेच्छा वाचून नवीन ऊर्जा मिळते. यामुळे दिवससुध्दा आनंद जाईल.आनंदाचे क्षण संपूर्ण दिवसभर लक्षात राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाण्याची हे सुविचार नक्की वाचा. चांगले विचार प्रत्येक व्यक्तीला आनंदी आणि मनमोकळेपणाने जगण्याचे बळ देतात. (फोटो सौजन्य – istock)
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागत करत आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
ही सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
पानगळ झाल्याशिवाय झाडाला
नवीन पालवी येत नाही,
त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा
सामना केल्याशिवाय चांगले
दिवस येत नाहीत…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून,
उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात
राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
कायम टिकणारी गोष्ट एकच,
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे
भरून पहावं माणसावर करावं,
माणुसकीवर करावं प्रेम करावं
तर मनापासून करावं…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ!
अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
आपला दिवस आनंदात जावो.
शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष,
लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो
शुभ सकाळ
आयुष्याच्या चित्रपटाला Once more नाही.
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा Reality show नाही.
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .
शुभ प्रभात
वडील देव आहेत आईची माया
धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान
आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला
आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही
परंतु एक आई वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही
पुढे गेलेले पाहून आनंदी होतात
शुभ सकाळ
थंडी क्षणाची गारवा कायमचा
ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची
भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची
सहवास क्षणाची पण ओढ कायमची हीच खरी नाती माणूसकीची
सकाळच्या सुंदर शुभेच्छा!
लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही
तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.
”शुभ सकाळ ”
डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||






