देवी दुर्गेच्या नावाने प्रेरित मुलींची नावे (फोटो सौजन्य - AI)
शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. 22 सप्टेंबरपासून या सोहळ्याला सुरुवात होईल. देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी यावेळी गरबा, दांडिया खेळत रात्री जागवल्या जातात. या सणाला एक वेगळाच उत्साह असतो. तुमच्या घरी यावेळी बाळाचा जन्म होणार असेल आणि जर तुम्हाला मुलगी झाली तर तुम्ही नक्कीच दुर्गा देवीच्या नावावरून प्रेरणा घेत नाव ठेऊ शकता. दुर्गा मातेच्या नावांचे अर्थ अत्यंत अर्थपूर्ण आणि युनिक असतात.
आपल्या घरी आलेली मुलगी ही दुर्गेचे आणि लक्ष्मीचे रूप आपण मानतो आणि त्यामुळेच या लेखातून तुम्ही दुर्गेच्या नावाचा अर्थ असणारी युनिक, रॉयल आणि मॉडर्न अशी अर्थपूर्ण नावं जाणून घ्या. वाचा मुलींच्या नावाची यादी –
अभिजीत सावंतच्या मुलींना पाहिलेत का? दोघींची नावे आहेत युनिक, अर्थासह जाणून घ्या
मुलींच्या नावाची यादी
आद्या – दुर्गेचे पहिले स्वरूप आणि आदिशक्तिचा अवतार असा या नावाचा अर्थ होतो. आद्या म्हणजे सुरूवात. तुमच्या मुलीसाठी हे युनिक आणि मॉडर्न नाव तुम्ही निवडू शकता
अनिका – सध्याच्या काळात परफेक्ट मॅच होईल असे देवी दुर्गेचे हे नाव आहे, अनिका. या नावाचा अर्थ म्हणजे अनुग्रह अथवा वेग असा होतो
नित्या – देवी दुर्गेचे हे नाव अनंतता दर्शविते
आर्या: दुर्गेचे एक नाव, ज्याचा अर्थ महान, आदरणीय आणि परोपकारी व्यक्ती असा होतो.
भव्या: म्हणजे भव्य किंवा वैभवशाली.
कात्यायनी: दुर्गेचे दुसरे रूप. हे नाव सहसा दाक्षिणात्य कुटुंबामध्ये ठेवले जाते. मात्र तुमच्या मुलीसाठी युनिक नाव म्हणून निवडू शकता
नंदिनी: म्हणजे मुलगी किंवा कन्या.
शिवानी: शिवाची पत्नी असल्याने, हे दुर्गेचे नाव आहे.
शांभवी: म्हणजे शांतीतून जन्मलेली आणि हे दुर्गेचे नाव आहे.
सिद्धिदात्री: सिद्धी आणि यश देणारी ती.
तरिता: दुर्गेशी संबंधित एक नाव
दुर्गा देवीची युनिक नावे अर्थासह
दीक्षा – एखाद्याला दान देणे अथवा बौद्धिक दान असाही याचा अर्थ होतो
नयनतारा – सुंदर डोळे, ज्या व्यक्तीचे डोळे सुंदर आहेत अशी
प्रिया – प्रिय, सर्वांना प्रिय असणारी व्यक्ती
सृष्टी – जगाची निर्मिती करणारी व्यक्ती, संपूर्ण जग असा या नावाचा अर्थ होतो
वामिका – वामनाची पत्नी म्हणून वामिका, तसंच यामध्ये दुर्गेचा अंश असल्याचे मानण्यात येते
यशस्वी – म्हणजे ‘तेजस्वी’, सर्व कामांमध्ये यश प्राप्त कऱणारी
अनन्या – अतुलनीय कामगिरी करणारी
आभा – प्रकाश, घराला तेजोमय करणारी अशी मुलगी
कामाक्षी – कामदेवाची देवी
कौशिकी – कौशिक ऋषींची कन्या
ख्याती – जगभर पसरणारी कीर्ती
अद्रिजा – देवी पार्वती आणि दुर्गेच्या नावाशी संबंधित हे नाव असून या नावाचा अर्थ पर्वत असा होतो
ईशानी – शक्तीचे प्रतीक म्हणून, ईशानी हे देवी दुर्गेचे समानार्थी नाव आहे. यामुळे या नावाला स्त्रीत्वाचा स्पर्श देखील मिळतो.
अन्विता – देवी दुर्गा ही ज्ञानवर्धक प्रतिभा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
आपल्या गोंडस मुलीसाठी तुम्ही दुर्गेची नावं शोधत असल्यास या यादीमधून नक्कीच तुम्हाला वेगळी आणि युनिक नावं मिळतील.
आषाढ महिन्यात जन्मलेल्या नवजात मुलींची गोंडस नावे! नावांचे अर्थ जाणून घ्या