फोेटो सौजन्य: iStock
सध्या अनेक जण आपल्या कामात इतके व्यस्त होऊन जातात की त्यांना आपल्या जागेवरून उठावेसे सुद्धा वाटत नाही. काही वेळेस त्यांना मित्रांचे किंवा कुत्म्बाचे कॉल्स सुद्धा येतात. पण जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत जागचा हलणार नाही असे ठरवून कित्येक जण बसल्या जागीच जेवण जेवत असतात आणि पाणी पित असतात. यामुळे वजन देखील झटपट वाढू शकते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
काही वेळेस तर आपल्यातील अनेक जण कामामुळे लघवी थांबून बसलो असतो. ही सवय जरी सामान्य सवय वाटत असली तरी याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, लघवी रोखून बसल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. लघवी वेळेवर करणे हे आपल्या शरीरासाठी अन्न किंवा पाणी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे, कारण ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
हे देखील वाचा: लैंगिक संबंधासाठी वयाचे नाही बंंधन, कोणत्याही वयात समाधानासाठी लक्षात ठेवा 6 गोष्टी
लघवी थांबवून बसल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढतो. जर तुम्ही लघवी बराच वेळ थांबवली असेल तर मूत्राशयात बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे संसर्ग होतो. वारंवार होणाऱ्या यूटीआयमुळे मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो.
वारंवार लघवी थांबवल्याने मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. यामुळे, त्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते, ज्यामुळे नंतर मूत्राशय पूर्णपणे रिकामे होऊ शकत नाही. यामुळे लघवी करताना जळजळ आणि वेदना होण्याची संभावना असते.
लघवी थांबवून बसल्याने किडनीवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. दीर्घकाळ असे केल्याने किडनी स्टोनचा धोकाही वाढू शकतो.
लघवी थांबवून ठेवल्याने मूत्राशयात सूज येऊ शकते, ज्यामुळे लघवी करताना वेदना, जळजळ आणि अस्वस्थता येते. काही गंभीर प्रकरणांमध्ये, मूत्राशयातील संसर्ग आणि जळजळ मूत्रपिंडापर्यंत पोहोचू शकते.
लघवी होण्याची चिन्हे दिसल्यास टी थांबवण्याऐवजी ताबडतोब बाथरूमध्ये जाऊन लघवी करा. कामाच्या वेळेत जर लघवी आली तर या दरम्यान लघवी करण्यासाठी थोडा वेळ काढा. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचे मूत्राशय जास्त काळ भरलेले ठेवू नका. तुम्ही बराच काळ प्रवास करत असाल तर बाथरूमची सुविधा कुठे आहे हे आधीच जाणून घ्या.
लघवी थांबवण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. वेळेवर लघवी करून तुम्ही केवळ लघवीचा मार्ग निरोगी ठेवू शकत नाही तर किडनीला गंभीर समस्यांपासून वाचवू देखील शकता. म्हणूच तज्ञ सुद्धा आपल्या पेशंटला लघवी न रोखण्याचा सल्ला देतात.