व्हॅलेंटाईन डे आलाय आता सगळे कपल्स एकत्र फिरतील. या दिवसाला सिंगल लोकं मात्र फार मनाला लावून घेतात. घेणारच की अहो! कारण जिथे जाऊ तिथे यांच्या डोळ्यांना आराम नाही. कोणत्या पार्कमध्ये गेलो तर तिथे ही कपल्स बसलेले असतात तर कोणत्या बीचवर जाऊ तर तेथेही प्रेम वाहतच असते. यामुळे, थोडंस का होईना पण मन तर जळणारच. पण, पोरहो! आता टेंशन घ्यायची गरज नाही.
सिंगल गॅंग! अशा प्रकारे साजरा करा तुमचा व्हॅलेंटाईन डे. (फोटो सौजन्य - Social Media)
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. हा दिवस आपण आपल्या कुटुंबाबरोबरही साजरा करू शकतो. या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर छान डिनर प्लॅन करू शकता.
या गोड दिवसाला तुम्ही ही गोड पदार्थ खाऊन साजरा करू शकता. एकतर स्वतःच्या हाताने घरी खाद्य पदार्थ बनवा किंवा चांगल्या हॉटेलमधून मागवा आणि हा दिवस एन्जॉय करा.
आधी सांगितल्याप्रमाणे, हा प्रेमाचा दिवस आहे. तर यादिवशी स्वतःवर प्रेम करणेही गैर नाही. तुम्ही हा दिवस सेल्फ केअरसाठी देऊ शकता. मुलांनो छान सलूनमध्ये जाऊन स्टाईल करा आणि मुलींनो छानशा पार्लरला भेट द्या.
या दिवशी तुम्ही छान शॉपिंग करू शकता. नवीन कपडे, परफ्यूम्स तसेच इतर तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करा. अशा वस्तू खरेदी करा की ज्या आठवणीत राहतील.
या दिवशी स्वतःचे छंद जपा. कवी असाल तर प्रेमावर छानशी कविता लिहा. चित्रकार असाल तर या खास दिवसावर चित्रकाम करा. काय माहित? तुमच्या कलाकृतीला पाहून कुणी कलाप्रेमी या पुढचा व्हॅलेंटाईन तुमच्यासोबत साजरा करेल.