अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे
राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण होते. मात्र आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पाऊस पडल्यानंतर साथीचे आजार वाढू लागतात. हे आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. पाऊस पडल्यानंतर अंगाला खाज सुटणे, फोड किंवा पुरळ येणे, त्वचा रोग इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते.
त्वचा रोगावर असलेला गुणकारी उपाय म्हणजे कडुलिंबाची हिरवी पाने. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. पाने त्वचा, केस , आरोग्यासाठी प्रभावी आहेत. कडुलिंबाचा वापर त्वचेसाठी केल्यानंतर त्वचा टवटवीत होण्यास मदत होते. यामुळे पावसाळ्यात होणारे त्वचा रोग बरे होतात. पावसाळ्यात होणाऱ्या त्वचा रोगांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक डॉ. श्रेय शर्मा यांनी सांगितलेला उपाय नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकावी.ही पाने टाकल्याने त्वचा रोग दूर होतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे त्वचेचे संसर्गापासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात. मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकावीत.
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरल्याने डास, चिलटे वाढू ल;लागतात. डास चावल्यानंतर हात पाय लाल होऊन जातात. तसेच यामुळे अनेकदा त्वचा रोग होण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही आजारी देखील पडू शकतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब टाकून अंघोळ करावी.
हे देखील वाचा: वाढलेले वजन कमी कारण्यासह इतर गुणांनी समृद्ध असलेल्या टोफूचा आहारात करा समावेश
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसात भिजल्यानंतर अंगाला खाज येऊ लागते. सतत खाज आल्यानंतर त्वचा लाल होते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची हिरवी पाने टाकावी. यामुळे त्वचा निरोगी होते. त्वचेवरील डाग, मुरुम आणि मुरुमांचे डाग हलके होण्यास मदत होते.
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे
कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा स्वच्छ होते. यासाठी अंघोळीच्या पाण्यात मूठभर कडुलिंबाची पाने टाकावीत. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हे पाणी अंघोळीसाठी घ्यावे. हा उपाय नियमित केल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवरील इतर आजार बरे होण्यास मदत होते.