झोपेत बडबडण्याची मुलांची समस्या (फोटो सौजन्य - iStock)
आजकाल अनेक मुलांची झोपेत बोलण्याची समस्या ऐकू येते. अर्थात ही समस्या आधीपासून आहे. मात्र आता ती जास्त प्रमाणात चर्चिली जाताना दिसते. मुलांचे शब्द समजत नसले तरी अनेकदा झोपेत मुलं बोलतात. लहान मुलांमध्ये अशी लक्षणे खूप सामान्य असतात. ही फक्त लहान मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्येही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे जवळ झोपलेल्या व्यक्तीची झोप सतत मोडू शकते.
मुलं झोपेत बोलतात पण दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत काय बोलले याबाबत त्यांना आठवत नाही.
अशा परिस्थितीत मनात एक प्रश्न येतो की यामागचे कारण काय असू शकते? हेल्थलाइनच्या मते, स्लीप टॉकिंग हा झोपेचा विकार आहे ज्याला Somniloquy असेही म्हणतात. ही समस्या लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.
काय आहे कारण?

झोपेत बोलण्याचं कारण काय (फोटो सौजन्य – iStock)
हेल्थलाइनच्या मते, झोपेत बोलणेदेखील अनुवांशिक असते. जर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार झोपेत बोलत असाल तर हे लक्षण मुलांमध्येही दिसू शकते. विशेषतः जर मूल आजारी असेल, कोणत्याही प्रकारच्या तणावाचा सामना करत असेल, नैराश्यासारखी लक्षणे दिसत असतील किंवा निद्रानाशाची समस्या असेल तर याचे प्रमाण अधिक असते. इतकेच नाही तर काही वेळा वाईट स्वप्ने पडल्यामुळे मुले रात्री झोपताना बोलू लागतात.
काय करायचं
रायझिंग चिल्ड्रन अकॅडमीच्या मते, जर तुमचे मूल रात्री झोपताना बोलत असेल तर ते शाळेतील परीक्षा, काही समस्या, भीती किंवा तणाव यामुळे असू शकते. अशा स्थितीत दिवसभरात मुलाशी त्या विषयावर बोलून त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा तुम्ही मुलाची अस्वस्थता शांत करून त्याला आधार द्याल तेव्हा त्याचा मनावरील ताण कमी होईल. अशाप्रकारे, झोपताना बोलण्याची किंवा झोप न लागण्याची समस्या देखील कमी होईल.
मुलांना यातून धोका किती

कशी घ्यावी काळजी (फोटो सौजन्य – iStock)
मुलांमध्ये स्लीप टॉकची समस्या सामान्य आहे जी वाढत्या वयानुसार कमी होते. अशा वेळी स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी अथवा सतत त्याचा विचार करून नाराज होण्याऐवजी त्याच्याशी सकारात्मक वागणे आणि त्यांना पाठिंबा देणे योग्य ठरेल. याशिवाय, झोपण्यापूर्वी मुलांशी काहीतरी छान बोला आणि मुलाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे झोपेत बोलण्याचा त्रास कमी होईल.






