बदलत्या काळानुसार, आपल्या केसांची काळजी घेणे फार गरजेचे आहे, असे न केल्यास केस खराब आणि निस्तेज होऊ शकतात. केस निरोगी ठेवण्यासाठी कंडिशनर आपली यात मदत करत असत. केसांना शॅम्पूने वॉश केल्यानंतर कंडिशनरचा वापर केला जातो. कंडिशनर केसांना खराब होण्यापासून वाचवतो आणि त्यांनी निगा राखण्यास मदत करतो. बाजारात अनेक ब्रँड्सचे कंडिशनर उपलब्ध आहेत. मात्र यांमध्ये बहुतेकदा रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो, जो आपल्या केसांसाठी घातक ठरू शकतो.
अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरीदेखील सोपा पद्धतीने एक प्रभावी आणि नैसर्गिक कंडिशनर तयार करू शकता. हा कंडिशनर आपण भेंडीपासून तयार करणार आहोत. होय, हे खरे आहे. फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की जेवणात खाल्ली जाणारी भेंडी ही आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही फायद्याची ठरते. भेंडीपासून तयार केलेला हा कंडिशनर केसांना मऊ , गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. चला तर हा कंडिशनर कसा तयार करायचा ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – घरात सतत बडबड पण चारचौघात गप्प बसतात मुलं? मग हे उपाय करतील मदत, वाढवतील आत्मविश्वास
अशाप्रकारे बनवा भेंडीचा कंडिशनर
दुसरी पद्धत
हेदेखील वाचा – नरेंद्र मोदी या भाजीची पावडर खाऊन राहतात फिट, लोखंडासारखे शरीर आणि सांधेदुखी होते दूर
भेंडीचा कंडिशनर वापरण्याचे फायदे
भेंडीचा हा कंडिशनर पूर्णपणे नैसर्गिक असल्याने याचा नियमित वापर केल्याने कोणतेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. हा कंडिशनर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायद्याचा ठरतो. नैसर्गिक घटकांपासून बनलेला हा कंडिशनर केवळ केसांसाठीच नाही तर स्कॅल्पसाठीही खूप फायदेशीर ठरतो. याच्या नियमित वापराने तुम्हाला निश्चितच केसांवर प्रभावी परिणाम दिसून येतील.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.