आजच्या स्पर्धात्मक जगात मन मोकळेपणाने बोलणे, व्यक्त होणे फार गरजेचे आहे. मात्र सध्याच्या जगात सर्वजण आपल्या स्मार्टफोनवर इतकी व्यस्त असतात की त्यांना इतरांशी बोलण्यात रस वाटत नाही. विशेष करून आजकालची किशोरवयीन मुलं चार चौघात बोलायला, आपले मत व्यक्त करायला फार घाबरतात. त्यांना भीती वाटत असते की लोक त्यांना चुकीचं ठरवतील, त्यांची थट्टा करतील आणि याचाच परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होत जातो. ते हळूहळू चारचौघात बोलायला, मिसळायला टाळाटाळ करू लागतात.
अनेकदा न बोलल्याने मन जड होतं आणि यामुळे मुलं आणखीन आपल्या कोशात जाऊ लागतात. अशा परिस्थितीत पालक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. असे केल्याने ते लोकांमध्ये मिसळून आपले मनं मोकळेपणाने व्यक्त करू शकतात. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही उपायांचा वापर करू शकता.
हेदेखील वाचा – नरेंद्र मोदी या भाजीची पावडर खाऊन राहतात फिट, लोखंडासारखे शरीर आणि सांधेदुखी होते दूर
प्रोत्साहन आणि प्रशंसा करणे
लहान मुलांचे मन फार कोमल असते. तुम्ही केलेली लहान सहन गोष्ट देखील त्यांच्या मनावर खोल परिणाम करते. अशात तुम्ही मुलांना प्रोत्साहित करून त्यांच्या लहान सहान गोष्टींची प्रशंसा करू शकता. याचा सकारात्मक पारिणाम होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. मुलं आपली क्षमता ओळखतात आणि नवनवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी उत्साहित होतात. यावेळी आपल्या मुलानं चुका सुधारण्याचेही प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून त्यांना आपल्या अपयशाची कधीही भीती वाटणार नाही.
चारचौघात बोलण्याचा सराव
मुलांना चारचौघात बोलायला अवघड जात असेल तर तुम्ही घरातच त्यांचा यासाठी सराव घेऊ शकता. यासाठी शेजाऱ्यांना किंवा मित्रमैत्रिणींना जमा करून त्यांच्यासोबत एक लहान संवाद साधने एक उत्तम पर्याय ठरेल. यामुळे हळूहळू आत्मविश्वास वाढू लागेल आणि नंतर ते मोठ्या गर्दीतही ते सहजपणे संवाद साधण्यास सक्षम बनतील.
हेदेखील वाचा – 99% लोकांना Chia seeds’चे हिंदी नाव माहिती नाही! तुम्हाला माहिती आहे का?
स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवा
मुलांना नेहमी त्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवायला हवं. पालकांनी यासाठी नेहमी आपल्या मुलांचे मत विचारात घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. मात्र लक्षात ठेवा मार्गदर्शन करताना कधीही त्यांचा निर्णयात हस्तक्षेप करू नये. जेव्हा मुलं आपल्या निर्णयांना योग्य समजतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते कोणतीही चिंता न करता मोकळेपणाने आपले मत इतरांसोबत मांडू लागतात.