बॉलीवूडचा ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा ही आपला रूमर्ड बॉयफ्रेंड झहीर इकबालसह 23 जून रोजी लग्न करणार असल्याच्या वृत्तावर सर्व ठिकाणाहून सध्या प्रतिक्रिया येत आहेत. वास्तविक सोनाक्षी सिन्हा गेले अनेक वर्ष अभिनेता झहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
मात्र तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना हे नातं अजिबात मान्य नाही असंच आता दिसून येत आहे. सोनाक्षी आणि झहीरने या वृत्तावर अजूनही मौन सोडलेलं नाही. मात्र याबाबत आता वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी असं काही वक्तव्य केलंय की सर्वांनाच धक्का बसलाय. (फोटो इन्स्टाग्राम)
काय म्हणाले वडील शत्रुघ्न सिन्हा?
अशा परिस्थितीत शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारले असता ते संतापले. ते म्हणाले की, ‘आजकाल मुले काहीही करण्यापूर्वी पालकांची परवानगी घेत नाहीत, उलट त्यांना येऊन फक्त सांगतात आणि माहिती देतात. मी या गोष्टीची वाट पाहत आहे. असे झाले तर मी आणि माझी पत्नी या जोडप्याला आशीर्वाद देऊ. वडिलांचा दर्जा आणि प्रेम प्रत्येक मुलासाठी अनमोल असते यात शंका नाही. पण कधी कधी मुलांच्या काही चुका वडिलांचे मन कायमचे तोडून टाकतात.’
[read_also content=”कठोर परिश्रमाशिवाय मिळेल यश, करा असे कर्म https://www.navarashtra.com/lifestyle/religion/a-person-can-achieve-success-without-hard-work-what-karma-will-lead-to-success-546625/”]
मुलांचा निर्णय
लहानपणापासूनच पालक आपल्या मुलांसाठी सर्व निर्णय घेत असतात. अशा परिस्थितीत, जेव्हा मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या पालकांशी निर्णयांवर चर्चा करत नाहीत, तेव्हा त्यांना खूप धक्का बसतो. विशेषतः मुलीच्या वडिलांसाठी अशा परिस्थितीला तोंड देणे खूप कठीण आहे. त्यामुळे वडिलांना धक्का बसेल असं काही करणं नक्कीच त्रासदायक ठरतं.
अनादर करणे
प्रत्येक नात्याचा पाया हा आदरावर टिकून असतो. अशा परिस्थितीत आपली मुलं आपल्या शब्दांचा आणि आपल्या भावनांचा तसंंच आपला आदर करत नाही हे वडील कधीही सहन करू शकत नाहीत. त्याच्याशी मोठ्या आवाजात किंवा चुकीच्या स्वरात बोलणे, वडिलांचे न ऐकणे, चुकीचे निर्णय़ घेणे हे वडिलांचा अथवा आईचा अनादर करण्यासारखेच आहे.
विश्वास तोडणे
पालकांचा विश्वास मुलांच्या आणि त्यांच्या नात्यातील महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे त्यांच्याशी खोटे बोलणे किंवा दिलेले वचन पूर्ण न केल्याने त्यांचे मन दुखावले जाऊ शकते. विश्वास कमी झाल्यामुळे नातेसंबंधांमध्ये दरारा निर्माण होतो, पुन्हा हे नाते जोडणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आपल्या आयुष्याचे निर्णय घेताना आपल्या आई-वडिलांना विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे.