२६ नोव्हेंबर घटना - दिनविशेष भारतीय संविधान दिन २६/११ २००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६११ म्हणून ओळखले जाते. २००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला. २००८: २६/११ - मुंबई आतंकवादी हल्ला १९९९: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली. १९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला. १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. १९६५: ऍॅस्टॅरिक्स (A-) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. १९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला. १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला. २६ नोव्हेंबर जन्म १९८३: क्रिस ह्यूजेस - फेसबुकचे सहसंस्थापक १९७२: अर्जुन रामपाल - हिंदी चित्रपट अभिनेते १९६१: करण बिलिमोरिया - कोबरा बीयरचे सहसंस्थापक १९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन - एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam)चे संस्थापक १९४९: मारी अल्कातीरी - पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान १९३९: टीना टर्नर - अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका १९३८: रॉडनी जोरी - ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ १९२६: रवी रे - भारतीय राजकारणी १९२४: जसुभाई पटेल - भारतीय क्रिकेटपटू १९२३: व्ही. के. मूर्ति - भारतीय सिनेमॅटोग्राफर १९२३: राजा ठाकूर - चित्रपट दिग्दर्शक १९२१: व्हर्गिस कुरियन - भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री १९१९: राम शरण शर्मा - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक १९०४: के. डी. सेठना - भारतीय कवि, विद्वान आणि लेखक १९०२: मॉरिस मॅकडोनाल्ड - मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक १८९८: कार्ल झीगलर - जर्मन रसायन शास्रज्ञ - नोबेल पुरस्कार १८९०: सुनीतिकुमार चटर्जी - भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक १८८५: देवेन्द्र मोहन बोस - वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक २६ नोव्हेंबर निधन २०२०: फकीर चंद कोहली - भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण २०१६: इव्हान मिकोयान - रशियन विमान मिग-२९चे सह-निर्माते आणि डिझायनर २०१२: एम. सी. नंबुदरीपद - भारतीय लेखक आणि अनुवादक २००८: हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते - मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी २००८: अशोक कामटे - शहीद पोलिस कमिशनर - अशोकचक्र २००१: चंद्रकांत कृष्णाजी जगताप - शिल्पकार १९९४: भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी