जे जे रुग्णालयात हृदय ट्यूमरवर यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया
नीता परब, मुंबई: देशभरात सगळीकडे वेगवेगळ्या आजारांचे असंख्य रुग्ण आहेत. कर्करोग, हृदयरोग, पोटासंबंधित आजार इत्यादी अनेक आजारांचे रुग्ण आहेत. बिघडलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात सुरुवातीच्या टप्प्यात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बऱ्याच हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर दुर्लक्ष केले जाते.शरीरात वाढलेले हानिकारक कोलेस्ट्रॉल किंवा हृद्यासंबंधित उद्भवणाऱ्या गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळी ब्रश करण्याशिवाय 2 पदार्थ चावल्याने दूर होईल दातांवरची घाण, तज्ज्ञांनी सांगितले Secret उपाय
राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या भायखळा स्थित जेजे रुग्णालय 180 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्या अनुषंगाने मागील अनेक वर्षापासून जेजे रुग्णालय नवीन कामगिरी करत आहे.त्याच शृंखलेत, रुग्णालयाच्या कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून 45 वर्षीय व्यक्तीला नवं जीवन दिले आहे. या व्यक्तीला यापूर्वी स्ट्रोकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्याला हृदय ट्यूमर असल्याचे निदान झाले.
ट्यूमरमुळे त्याला दुसरा ब्रेन स्ट्रोक किंवा फुफ्फुसांचा संसर्ग होऊ शकतो, परंतु डॉक्टरांनी ट्यूमर काढून टाकण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी केली आहे आणि त्या व्यक्तीला नवं जीवन दिले आहे.मालाड येथील रहिवासी 45 वर्षीय वनेश पटेल यांना ब्रेन स्ट्रोकच्या उपचारांसाठी जेजे रुग्णालयाच्या औषध विभागात दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकमुळे शरीराच्या डाव्या भागात बराच अशक्तपणा निर्माण झाला होता. रक्तदाब नेहमीच जास्त असल्याने वनेशचा टूडी इको करण्यात आला. तपासणीत त्याच्या हृदयाच्या उजव्या भागात गाठ असल्याचे आढळून आले.
जे जे रुग्णालयात हृदय ट्यूमरवर यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया
दरम्यान, त्यांच्या स्ट्रोकच्या यशस्वी उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर रुग्णालयाच्या ओपीडी स्तरावर त्यांच्या गाठीची पुष्टी करण्यासाठी एमआरआय करण्यात आला. एमएमआरआय स्कॅनमध्ये हृदयात गाठ असल्याचे निष्पन्न झाले.
हृदयात गाठ असल्याने त्या भीतीने वनेश उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात गेले परंतु डॉक्टरांनी ते गंभीर असल्याचे सांगितले आणि वनेशला पुन्हा जेजे रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वनेश उपचारासाठी जेजे रुग्णालयात परतले.
वर्षानुवर्षे पोटात साचलेली घाण लगेच शरीराबाहेर पडेल; बाबा रामदेव यांनी सांगितल्या 5 जादुई ट्रिक्स
सीव्हीटीएस विभागाचे असोसिएट प्रोफेसर आणि युनिट प्रमुख डॉ. सूरज वासुदेव नागरे यांनी वनेशची तपासणी केली आणि त्यांना ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. वनेश यांच्या संमतीनंतरडॉ. सूरज नागरे, रुग्णालयाचे डीन डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि विभागप्रमुख डॉ. आशिष राजन भिवापूरकर यांच्या मदतीने आणि सहकार्याने हृदयातून गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टराकडून सांगण्यात आले.