पावसाळ्यात घरबसल्या वाढवा शरीराची रोगप्रतिकारशक्ती! रोजच्या आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन
राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण असते. या दिवसांमध्ये अनेक लोक बाहेर फिरायला जातात. मात्र वातावरणातील दमट आणि कोरडेपणा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या इत्यादी अनेक गंभीर आजारांची शरीराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र सतत गोळ्या औषंधाचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करावा.(फोटो सौजन्य – iStock)
पावसाळ्यातील आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात घरगुती आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही कायमच फिट, तंदुरुस्त राहाल. घरगुती उपाय केल्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते, रक्त शुद्ध होण्यास मदत होते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे पदार्थाची चव वाढते. हळदीमध्ये असलेले गुणधर्म शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद साथीच्या आजारांपासून शरीराचे रक्षण करते. हळदीमधील ‘कर्क्युमिन’ शरीरात विषारी घटक बाहेर काढून टाकतात. सकाळी उठल्यानंतर एक चमचा मधात हळद मिक्स करून खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होईल, श्वसनमार्ग स्वच्छ राहील आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी दुधाचा चहा न पिता आल्याच्या चहाचे किंवा काढ्याचे सेवन करावे. या काढ्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यासाठी एक ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात एक तुकडा आलं, तुळशीचं पान, दालचिनी पावडर आणि काळीमिरी टाकून चहा व्यवस्थित उकळवून घ्या. चहाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध टाकून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
रात्री अचानक लागलेली भूक भागवण्यासाठी बिस्कीट खाण्याऐवजी करा ‘या’ पदार्थाचे सेवन, राहाल कायम निरोगी
आरोग्यासाठी लसूण अतिशय फायदेशीर आहे. लसूण खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये अँटीबायोटिक व अँटीव्हायरल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्यात लसूण काढ्याचे सेवन करावे. सर्दी, खोकला झाल्यानंतर तुम्ही तुपात भाजलेला लसूण खाऊ शकता. यामुळे खोकला कमी होईल. साथीच्या आजारांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी लसूण काढ्याचे सेवन करावे.