सुधा मूर्तींनी दिल्या संसाराच्या टिप्स
इन्फोसिस कंपनी सुरू करणाऱ्या एन.आर. नारायण मूर्ती यांना त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्या मदतीशिवाय हे काम कधीच शक्य झाले नसते असे त्यांनी वारंवार आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. IT कंपनी भारतात आणण्याचे जेवढे श्रेय नारायण मूर्ती यांना दिले जाते, तितकेच श्रेय त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनाही आहे.
असे नेमके का? याचे उत्तर काही काळापूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या सुधा मूर्ती यांनी स्वतः दिले होते. त्यांनी सांगितले होते की, जेव्हा तिचा नवरा कंपनी सुरू करण्याचा विचार करत होता तेव्हा त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यानंतर सुधा मूर्ती यांनी त्यांना घरखर्चासाठी साठवलेल्या पैशातून मदत केली आणि मग ही कंपनी उभी राहिली. यासाठी त्यांनी सर्व संसार करणाऱ्या पती – पत्नींना काही महत्त्वाचे सल्लेही दिले. त्यात पत्नीने ही एक गोष्ट केली तर संसार नक्कीच सुखाचा होतो. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
लपवून पैशाची बचत
पैशाची बचत करणे महत्त्वाचे
सुधा मूर्ती यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रत्येक महिलेला पतीपासून लपवून पैसे वाचवण्याचे आवाहन केले. याचे कारणही त्यांनी सांगितले की, एकदा पैसे दिसले की ते खर्च होतात. पण आपण पतीपासून जे पैसे लपवून ठेवतो ते योग्य वेळी संसारालाच कामी येतात. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच नवऱ्यापासून लपवून केल्यास फायदा होतो असं त्यांनी सांगितले.
बचतीबद्दल सांगू नये
तुम्ही तुमच्या बचतीबद्दल कोणालाही सांगू नये. असे केल्याने ते पैसे लवकर खर्च होण्याची शक्यता असते. विशेषत: जेव्हा पुरुषांना माहीत असते की घरात पैसा आहे, तेव्हा ते खर्च करण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्यापासून हा पैसा कसा लपून राहील हे जास्तीत जास्त लक्षात घ्या आणि पैशांची बचत करा.
नवऱ्याला देता येईल पाठिंबा
पैशाची बचत करून नवऱ्याला पाठिंबा
आपल्या नवऱ्याला आर्थिक मदत करण्यासाठी काम करणे आवश्यक नाही. स्त्रियाही आपल्या बुद्धीचा वापर करून घर चालवण्यासाठी दिलेले पैसे वाचवू शकतात. आणि गरज पडल्यास याच पैशातून ती आपल्या पतीला योग्य आधार देऊ शकते आणि पूर्वपरंपरेपासून असे अनेक महिलांनी केल्याचेही त्यांनी सांगितले होते.
नवऱ्याच्या मनात आदर वाढतो
कमी उत्पन्न असतानाही पैसे वाचवण्याचे कौशल्य केवळ कुशल स्त्रीकडेच असते. अशा महिलांना त्यांच्या पतीकडून खूप आदर मिळतो हेदेखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. आपल्या नवऱ्याला गरज असताना या पैशातून केलेली मदत नक्कीच आदरास पात्र ठरते.