शाश्वत आणि नैतिक पद्धतींवर भर देताना पारंपरिक भारतीय हातमाग हस्तकलांना प्रोत्साहन देणारा ब्रॅंड Mrida च्या वतीने Bulbul Collection for Summer-Spring 2024 चे अनावरण करण्यात आले. जी निसर्ग आणि कापड तसेच हस्तकलेच्या कारागीर पद्धतींपासून प्रेरणा घेते आणि त्याद्वारे भारताच्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वस्त्राचा आदर जपते.
भारतीय नारी आणि साडीची आवड नाही असं होऊच शकत नाही. आपल्या कपाटामध्ये भरभरून साड्या असतात आणि तुम्हाला जर पारंपरिक आणि आधुनिकतेचे मेळ हवा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. या साड्यांचे कलेक्शन नक्की कसे आहे ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत.
साड्या ज्या वॉर्डरोबमध्ये असाव्या
उत्कृष्ट प्रतीच्या सुती रेशमाने तयार केलेली, अतिशय तलम, वजनला हलकी, त्वचेसाठी अनुकूल अशी अनुभूती देणारी ही साडी तुम्हाला अधिक स्टायलिश बनवते आणि याशिवाय तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालते. ताजे आणि मातीशी मिळते-जुळते रंग, फिकट रंगसंगती आणि आकर्षक रंगछटांनी प्रेरणा घेऊन हे कलेक्शन बनविण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – राधिका मर्चंटचा मॅजेस्टिक प्रिन्सेस लुक, इंटरनेटवर व्हायरल फोटोजचा धुमाकूळ
ब्लॉक प्रिंट डिझाईन्स
हाताने तयार केलेल्या ब्लॉक प्रिंटच्या स्वरूपात या साड्या नक्कीच तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आणि अगदी ऑफिसमधील मीटिंग्जसाठीही उपयुक्त ठरू शकतात. या जरी समर – स्प्रिंगसाठी तयारा करण्यात आल्या असल्या तरीही तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये याचा वापर नक्कीच करू शकता. भारतीय हातमागाचा वारसा जतन करणे हाच याचा उद्देश आहे आणि अनोख्या शैलीने या साड्या तयार करण्यात आल्यामुळे तुम्हाला या नक्कीच आवडतील.
पर्यावरणाला पूरक साडी
या साड्या पर्यावरणाला पूरक अशा आहे. तर पर्यावरणाशी संबंधित डिझाईन या साड्यांचे करण्यात आले आहे. तसंच दिसायला अत्यंत क्लासी आणि एलिगंट अशा या साड्या नक्कीच तुम्हाला आवडतील. या साड्यांचे रंग अत्यंत सुखद असून त्याला क्लासी टच देण्यात आला आहे. Mrida Sarees च्या सह-संस्थापिका श्रिया नागी यांनी सांगितले की, हे नाव वडिलांनी दिले असून आपले टोपणनाव आहे आणि हे कलेक्शन बालपणीच्या प्रेमळ आठवणींना जपण्यासाठी काढण्यात आले आहे.
ट्रेंडी कलर्स
या साड्यांचे रंग अत्यंत ट्रेंडी आणि ऑन गो असून कोणत्याही कार्यक्रमासाठी परफेक्ट सूट असणारे आहेत. तसंच आजच्या पिढीला परफेक्ट स्टाईल आणि फॅशनचे कॉम्बिनेशन म्हणून ही साडी आपल्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करून घेता येईल. पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा उत्तम मेळ तुम्ही शोधत असाल तर ही स्टाईल नक्कीच तुमच्यासाठी आहे.