किडनीच्या आरोग्यासाठी बाबा रामदेव यांचे उपाय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
आपल्या शरीरातील किडनी ही एखाद्या फिल्टरपेक्षा कमी नाहीये, ती शरीरातील बहुतेक घाण काढून टाकून आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. जर किडनीमध्ये काही समस्या असेल तर रक्त स्वच्छ करणे कठीण होते. जर तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असेल किंवा क्रिएटिनिन वाढले असेल तर योगगुरू बाबा रामदेव यांनी यावर उत्कृष्ट उपाय सांगितले आहेत. त्यांच्या मते, एक खास पान हे किडनीसाठी औषधापेक्षा कमी नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खास पान कोणते आहे? तर हे पान आहे पिंपळाचे पान. आश्चर्य वाटलं ना? पण पिंपळाचे पान सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः किडनीसाठी याचा उपयोग करून घेता येतो. याचा वापर कसा करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
पिंपळाच्या पानाचे फायदे
पिंपळाची पाने शरीरासाठी फायदेशीर
बाबा रामदेव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, “हिंदू धर्मात आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो. खरं तर, पिंपळाचे झाड हे असे स्थान आहे जिथे आपल्या ऋषी-मुनींनी योग आणि ध्यानाद्वारे सिद्धी प्राप्त केल्या. त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. ते शरीर, इंद्रिये, जीवन, मन, चेतना आणि ऊर्जा सुधारते. त्याच्यासोबत बसून किंवा उभे राहून, आपली सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आपले शरीर विश्वाच्या उर्जेने भरलेले आहे. तुम्ही त्याची कच्ची पाने तशीच चावू शकता. त्याला चव नाही.”
कोणते पदार्थ खाऊन रोज घटेल 1 किलो वजन, Baba Ramdev ने सांगितले थुलथुलीत पोट होईल सपाट
बाबा रामदेव यांचा व्हिडिओ
कसा करावा उपयोग
बाबा रामदेव म्हणाले, “फक्त १० पिंपळाची पाने आणि १० ते २० कडुलिंबाची पाने घेऊन त्यांचा रस काढून पिण्यास दिल्याने लोकांच्या मूत्रपिंडाचे कार्य सुधारले. ज्यांचे क्रिएटिनिन ८ ते १८ च्या दरम्यान जास्त होते, त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य देखील सामान्य झाले” असा अनुभवही त्यांनी या व्हिडिओतून सांगितला आहे.
फर्टिलिटीसाठी चांगले
वंध्यत्वाच्या समस्यांसाठी उपयुक्त
मुले नसल्याच्या दुःखाने त्रस्त असलेल्यांना अथवा ज्यांना वंध्यत्व आहे त्यांनादेखील रामदेव यांनी आशेचा किरण दिला आहे. ते म्हणाले की, पिंपळाची पाने वंध्यत्वासाठीदेखील उत्तम आहेत, या झाडाची मुळे नपुंसकतेसाठीदेखील एक उत्तम औषध आहेत. याचे तुम्ही नियमित सेवन केल्याने वंध्यत्वाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत मिळते. आय़ुर्वेदात पिंपळाच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे”
उन्हाळ्यात ५ पाने आराम देतील
यावेळी तीव्र उष्णता दिसून येत असल्याने, बाबा रामदेव म्हणाले की, पिंपळ, शीशम, कडुलिंब आणि बेल आणि कोरफडीची पाने, ही ५ पाने अशी आहेत की ती तुम्हाला तीव्र उष्णतेतही आराम देतात. आपल्याकडे मुंबईत बारा महिने उन्हाळा असल्याने तुम्ही या पानांचा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घेऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.