फोटो सौजन्य - Social Media
उन्हाळ्यात उष्माघातसारखी स्थिती येणे सामान्य आहे. मुळात, तापमानात उष्णता वाढत चालली आहे आणि याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत चालला आहे. लोकांना या उन्हात गर्मीची झळ येत आहे. याला परिस्थितीला आपण लू या नावाने ओळखतो. एकंदरीत, लू म्हणजे उन्हामुळे होणारी उष्माघातासारखी स्थिती आहे. यामध्ये शरीर थकते. भर उन्हात चालताना चक्कर आल्यासारखी, डोके दुखी, उलटी होणे , अशक्तपणा, ताप किंवा बेशुद्ध होण्यासारखी परिस्थिती उद्भवली तर समजून जा की ही सारी लक्षणे लू होण्याची आहेत आणि आपण उष्माघाताचे शिकार झाले आहोत.
या परिस्थितीत ताबडतोब बचाव करणे आवश्यक असते, पण उष्माघात टाळण्यासाठी काही उपाय आहेत जे तुम्ही अनुसरू शकता. शक्यतो, दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. घराबाहेर जाताना हलक्या रंगाचे व सूती कपडे घाला. टोपी, स्कार्फ, छत्री वापरून चेहरा आणि डोके झाकून ठेवा. सावलीत थांबा आणि मध्ये मध्ये विश्रांती घ्या. भरपूर थंड पाणी प्या आणि जर घरात असाल तर पंखा, कूलर किंवा एसी वापरा. शरीर जितके थंड ठेवता तितके ठेवा.
उन्हाळ्यात आपल्या सेवनावर विशेष लक्ष द्या. पाणी भरपूर असलेले फळांचे सेवन करत चला. एकंदरीत, फळांमध्ये कलिंगड, टरबूज, संत्री आणि अननस यांचे सेवन करत चला. तसेच काकडी, टमाटर आणि पालक अशा पालेभाज्या व थंड प्रभाव देणाऱ्या भाज्यांचे सेवन करत चला. दही, लस्सी आणि ताक या दुग्धजन्य पदार्थांचे विशेष सेवन करत चला. नारळाचे पाणी पीत चला.
या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवत चला. किमान ४ लिटर पाणी पीत चला. माठामध्ये असणारे पाणी पीत चला. ताक, लिंबू सरबत यांचा आवर्जून सेवन करा आणि शरीर हायड्रेट आणि थंड ठेवा. या दिवसात पचण्यास गरम पदार्थ खाणे टाळा. जास्त तेलकट आणि मसालेदार खाणे कमी करा किंवा बंदच करा. कॅफीनयुक्त पदार्थ कमी करा. मांसाहार करणे टाळा. थंड पेय, सॉफ्ट ड्रिंक्स, मद्यपान टाळा, यामुळे डिहायड्रेशन होतो