कमी वयात कॅन्सर होऊ नये म्हणून 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
धावपळीची जीवनशैली,कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपचन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली कमी वयात अनेकांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराची लागण होत आहे. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. नुकतेच अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी तिने अखरेचा श्वास घेतला. कमी वयात कॅन्सर होण्यामागे अनेक कारण आहेत. अनुवंशिकता, चुकीची जीवनशैली, शरीरात वाढलेला तणाव, धुम्रपान, चुकीचा आहार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच निरोगी राहण्यासाठी आरोग्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला कमी वयात कॅन्सर होऊ नये म्हणून आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.शरीराची योग्य काळजी आणि संतुलित आहार आणि शारीरिक हालचाली केल्यास शरीर कायमच तंदुरुस्त राहील आणि तुम्ही दीर्घकाळ जीवन जगू शकता.
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं तंबाखू किंवा दारू, सिगारेट करण्याची सवय आहे. सतत धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुस आणि तोंडाचे आरोग्य बिघडून जाते. यामुळे स्तन, आतडे आणि यकृताचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे धूम्रपान किंवा दारू, सिगारेटचे अजिबात सेवन करू नये.
दैनंदिन आहारात कायमच हिरव्या पालेभाज्या, फळ भाज्या, कडधान्य, ड्रायफ्रूटचे सेवन करणे आवश्यक आहे. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक पदार्थ शरीर, केस आणि त्वचेचा कायमच निरोगी ठेवतात. आहारात लाल मांस आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.
नियमित शारीरिक हालचाली केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जेवल्यानंतर अनेकांना लगेच झोपण्याची सवय असते. पण असे न करता जेवणाच्या दोन किंवा तीन तासांनंतर झोपावे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर ध्यान, प्राणायाम किंवा योगासने करावीत.