हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
शरीरातील लहान आणि अतिशय नाजूक अवयवांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. त्यातील अतिशय नाजूक अवयव म्हणजे हृदय. हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक सतत दुर्लक्ष करतात. ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाला हानी पोहचवते. दैनंदिन आहारात सतत तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. शरीरात वाढलेला पिवळ्या रंगाचा चिकट थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो.ज्यामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानंतर हृदयाला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. कधी अचानक घाम येणे तर कधी छातीमध्ये वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर पायांवरीलन केसांची वाढ थांबणे, नखांची वाढ खुंटणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला हार्ट ब्लॉकेज झाल्यांनतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर नखांची वाढ खुंटते. नख हळूहळू वाढतात आणि नखांमधील ताकद कमी होऊन जाते. रक्ताभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर नखांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हृदयाच्या समस्या वाढू लागतात आणि ऑक्सिजन आणि पोषणाचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे नखांची वाढ थांबते.अनेकांना ही समस्या अतिशय सामान्य वाटते. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर समस्या उद्भवतात.
हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांवरील केस गाळून जातात. पायांवरील केस सतत कमी झाल्यानंतर सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. पायांवरील त्वचा पिवळी पडणे,थंडी असून उष्णता वाटणे, रक्तभिसरणात अडथळे निर्माण होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.
शरीरात कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर डोळ्यांभोवती पिवळ्या रंगाचे ठिपके येतात. डोळ्यांच्या आजूबाजूला वाढलेले पिवळे ठिपके कोणत्याही इतर आजारांची लक्षणे नसून कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे आहेत. या समस्येला झेंथेलास्मा असे म्हणतात. याशिवाय हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यांनतर डोळ्यांच्या सौंदर्यावर गंभीर परिणाम दिसून येतात.
हार्ट ब्लॉकेजची कारणे:
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. आराम केल्यानंतरही सतत थकवा जाणवणे हे ब्लॉकेजचे लक्षण असू शकते.
हार्ट ब्लॉकेजची लक्षणे:
छातीत दाबल्यासारखे वाटणे, जळजळ होणे किंवा तीव्र वेदना होणे.शारीरिक श्रम केल्यावर किंवा अगदी हलके काम करतानाही श्वास घ्यायला त्रास होणे. सतत थकल्यासारखे वाटणे आणि आराम करूनही ही समस्या कमी न होणे.
हार्ट ब्लॉकेजचे निदान:
इलेक्ट्रोकार्डियोग्राम, ताण चाचणी, इकोकार्डिओग्राम, कोरोनरी एंजियोग्राफी इत्यादी चाचण्या केल्या जातात.