Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Obesity: लठ्ठपणाचा वाढता आजार, वजन कमी करणे दिवसेंदिवस का होतेय कठीण? तज्ज्ञांचा इशारा

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लठ्ठपणा ही मोठी समस्या होत चालली आहे. वेगाने वाढलेले शहरीकरण आणि अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. पण लठ्ठपणाच्या या आजाराबाबत आता तज्ज्ञांनीही मोठा इशारा दिला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 08, 2026 | 11:55 AM
लठ्ठपणाची वाढती समस्या (फोटो सौजन्य - iStock)

लठ्ठपणाची वाढती समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • लठ्ठपणा का वाढतोय, काय आहे समस्या 
  • वजन कमी करणं का झालंय कठीण 
  • लठ्ठपणाबाबत दिला तज्ज्ञांनी इशारा 
सध्या वेगाने होणारे शहरीकरण, बसून राहण्याची सवय आणि बदललेली आहार पद्धत यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांसाठी वजन नियंत्रण करणे अधिकाधिक कठीण होत आहे. त्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी आता तातडीने पावले उचलणे गरजेचे झाले आहे. या लेखात तज्ज्ञांनी दिलेल्या सोप्या टिप्सचा अवलंब करून जीवनमान सुधारता येऊ शकते.

शहरी भारतात लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे आणि तो मोठा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनत आहे. लहान मुलांपासून ते प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण याचा सामना करत आहेत. जलद जीवनशैली, दीर्घ कामाचे तास आणि जास्त कॅलरी असलेले अन्न सहज उपलब्ध असल्याने निरोगी वजन राखणे कठीण झाले आहे. अनेकांना वाढलेले वजन कमी करणे आव्हानात्मक वाटते. लठ्ठपणा फक्त दिसण्यापुरता मर्यादित नसून, तो मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवतो. त्यामुळे वजन कमी करणे कठीण का होत आहे आणि त्यावर उपाय काय हे समजून घेणे आवश्यक आहे. डॉ. शशांक शाह, बॅरिएट्रिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम

वजन कमी करणे कठीण का होत आहे?

शहरातील अनेक लोक दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करतात, वाहतुकीत वेळ घालवतात आणि शारीरिक हालचाल कमी असते. त्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि चरबी साचू लागते. बसून राहण्याची सवय वजन कमी होण्यास अडथळा ठरते.

अयोग्य आहार ही आणखी एक मोठी समस्या आहे. अनेकजण प्रोसेस्ड, पॅकेज्ड आणि हॉटेलमधील अन्न खातात, ज्यामध्ये साखर, अनारोग्यदायी फॅट्स आणि मीठ जास्त असते. यामुळे शरीरात अनावश्यक कॅलरीज वाढतात, पण पोषण मिळत नाही. वारंवार खाणे आणि अनियमित जेवणाच्या वेळेमुळेही मेटाबॉलिझम बिघडतो आणि वजन वाढते. तणाव हा देखील वजन वाढण्यामागील महत्त्वाचा घटक आहे. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या आणि शहरी जीवनशैलीमुळे तणाव वाढतो. यामुळे भावनिक खाणे वाढते आणि हार्मोन्समध्ये बदल होऊन वजन वाढते.

अनियमित झोप, उशिरापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर आणि शिफ्टमध्ये काम करणे यामुळे भूक आणि तृप्ती नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता वाढते. तसेच, व्यायामासाठी कमी मोकळी जागा आणि वाढते प्रदूषण यामुळे लोक बाहेर जाऊन शारीरिक हालचाल करण्यास टाळाटाळ करतात. काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणेही लठ्ठपणाला कारणीभूत ठरतात.

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

योग्य वजन कसे राखावे?

लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही, तर छोटे पण नियमित बदल महत्त्वाचे आहेत:

  • शक्यतो घरचे, कमी तेलातील आणि संतुलित अन्न खा 
  • आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा 
  • दररोज किमान ४५ मिनिटे शारीरिक हालचाल करा (जसे की जलद चालणे) 
  • योग, ध्यान किंवा छंदांच्या मदतीने तणाव कमी करा 
  • दररोज ७–८ तासांची चांगली झोप घ्या 
  • पुरेसे पाणी प्या 
  • क्रॅश डायट टाळा आणि हळूहळू, टिकाऊ बदल करा 
आता वेळ आली आहे अतिरिक्त वजन कमी करण्याची, लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यातून होणाऱ्या हृदय, किडनी, लिव्हरचे आजार तसेच स्ट्रोकसारख्या गंभीर समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याची. दररोज ठराविक दिनचर्या पाळा, स्वतःवर नियंत्रण ठेवा, निरोगी आहार घ्या आणि वजन कमी करण्यासाठी सातत्य ठेवा.

Web Title: The rising epidemic of obesity why is weight loss becoming increasingly difficult experts warn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • health issues
  • Health Tips
  • obesity

संबंधित बातम्या

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
1

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
2

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या
3

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

‘ही’ असू शकतात पित्ताशयातील खड्यांची लक्षणे, वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाकडे दुर्लक्ष करणं ठरेल त्रासदायक
4

‘ही’ असू शकतात पित्ताशयातील खड्यांची लक्षणे, वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाकडे दुर्लक्ष करणं ठरेल त्रासदायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.