पायात चांदीचे पैंजण घालण्यामागे असलेली वैज्ञानिक कारण
भारतासह जगभरातील सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे दागिने परिधान करतात. त्यामध्ये महिला हातामध्ये बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, हार, नथ, कानातले इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालतात. दागिने घातल्यानंतर महिलांच्या सौदंर्यात आणखीन वाढ होते. सर्वच महिलांच्या अंगावर सोनं,चांदीचे दागिने उठून दिसतात. तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे दागिने घालण्याची परंपरा आहे. तर काही दागिने हे श्रद्धा आणि परंपरेशी निगडित आहेत. पूर्वीच्या काळी तयार करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये थोडाफार बदल झाला असला तरीसुद्धा दागिन्यांची ओळख आणि नाव तसेच टिकून आहे. सर्वच महिला बांगड्या, कानातले, नथ, हार इत्यादी दागिने सोन्याचे घालतात. मात्र पायात चांदीचे पैंजण का घातले जातात? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. चला तर जाणून घेऊया यामागे नेमके काय कारण आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सण उत्सवातच नाही तर नियमित घाला दागिने, जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे
सण उत्सवात आणि दैनंदिन जीवनात महिला पायांमध्ये पैंजण घालतात. पायात घातलेले पैंजण हे प्रामख्याने चांदीचे असावे, असे अनेकदा बोलले जाते. तसेच स्त्रियांनी परिधान केलेले सर्वच दागिने हे सोन्या किंवा चांदीचे असावेत असे नाही. कंबरेच्या वर घातले जाणारे दागिने हे शक्यतो सोन्याचे असावेत आणि कंबरेच्या खाली घातले जाणारे दागिने हे चांदीचे असावे, अशी मान्यता आहे. कानातले, झुमके, हार, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी सर्व दागिने सोन्याचे परिधान केले जातात. पायात घातले जाणारे दागिने हे चांदीचेच असावेत. त्यामध्ये जोडवी, तोरड्या, वाळा, पैंजण.

पायात चांदीचे पैंजण घालण्यामागे असलेली वैज्ञानिक कारण
पायात घातला जाणारा सगळ्यात लोकप्रिय दागिना म्हणजे पैंजण. सर्वच महिला आणि मुलींना पैंजण घालायला खूप आवडत. दोन्ही पायात एक सारख्या साखळ्यांना घुंगरू बसवलेले असतात, त्याला पैंजण असे म्हणतात. पैंजणला इंग्लिशमध्ये ‘अँकलेट’ असे बोलले जाते. तसेच काही राज्यांमध्ये सौभाग्याचा दागिन्यांमध्ये मंगळसूत्रासोबतच पैंजणांना सुद्धा विशेष महत्व आहे.
हे देखील वाचा: हातांची शोभा वाढवण्यासाठी हातामध्ये घाला ‘या’ डिझाईन्सच्या बांगड्या, हात दिसतील सुंदर
महिलांनी पायात पैंजण घातल्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाऊन शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पैंजणाच्या घुंगरांमधून येणारा आवाज वातावरणात आनंद निर्माण करण्याचे काम करतो. कोणत्याही प्रकारची विनाशकारी ऊर्जा मुलीपासून दूर राहण्यासाठी अनेकदा पायात पैंजण घालण्याचा सल्ला महिला आणि मुलींना दिला जातो. चांदीमध्ये इच्छाशक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे महिलांच्या पायात चांदीचे पैंजण असतात.






