फोटो सौजन्य - Social Media
लग्न झाले कि दोन वेगवेगळ्या विचारांची व्यक्तिमत्व एकत्रच येतात. आता त्या दोन्ही मेंदूंना एकत्र संसार करायचा असेल तर दोघांचा ताळमेळ असणे महत्वाचे असते. दोघांचे विचार सारखे नसतात त्यामुळे भांडण आणि तंटा होणे साहजिक आहे. पण नाते टिकवायचे असेल तर कधी कधी एकाने माघार घेणेही उत्तमच असते. नात्यात तडजोड करावीच लागते. त्याशिवाय संसार टिकवता येत नाही. पण कधी कधी जोड्यांमध्ये होणाऱ्या काही चुका त्यांचे वैवाहिक जीवन बदलून टाकते. हळू हळू ही परिस्थिती इतकी बिकट होते कि नरक अनुभूती मिळण्यास सुरुवात होते. जर तुमच्याकडून या चुका होत असतील तर आतापासूनच टाळण्यास सुरुवात करा. चला तर मग जाणून घेऊयात या चुकांबद्दल:
नात्यात भांडण होणे साहजिक आहे. परंतु, या भांडणांमध्ये समजदारी दाखवून नाते टिकवण्यासाठी एकाने माघार घेणे महत्वाचे आहे. जर दोघांनीच भांडणे सुरु ठेवलीत आणि कुणीही माघार घ्यायला तयार नसल्यास नाते सुरळीत राहणार नाहीच. त्यासाठी कुणी एकाने तडजोड करणे महत्वाचे असते. नात्यात एकमेकांच्या भावना जाणून घेणे महत्वाचे असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना कधी जाणून घेतल्या नाहीत, तर एक वेळी अशी येईल कि तुमचा जोडीदार तुम्हाला कंटाळून जाईल. नात्यात स्वतःपेक्षा जास्त आपल्या जोडीदाराचा विचार करावा लागतो. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्यावी लागते, तरच नाते फुलत जाते.
नात्यामध्ये दोघांच्या निर्णयांना सम्मान असला पाहिजे. दोघांच्या विचारांना सामान वागणूक दिली पाहिजे. जर एखादा नेहमीच त्याचेच खरे करत असेल तर हे नाते फार काळ टिकत नाही. नात्यामध्ये वेळ फार महत्वाचा असतो. रोजचा संवाद फार महत्वाचा असतो. या संवादाला दिशा नसतात. या संवादातून नाते आणखीन फुलत जाते. आपल्या जोडीदाराला काय हवंय? या सगळ्या गोष्टी फक्त संवादातून सुटतात. मुळात, घरच्या पुरुषावर कमवण्याची जबाबदारी असते. परंतु, आताच्या स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कमवत आहेत. पण कधी कधी आर्थिक समस्या नात्याला कमकुवत करतात. पण, चटणी भाकर खाऊन आपल्या जोडीदारासोबत सुखाने राहणारा जोडीदार खरा असतो आणि त्याचे प्रेम हे फार शुद्ध असते.
जर तुमच्या पार्टनरचा एक उद्देश असेल कि त्याला जीवनात काही तरी साध्य करायचे आहे. तर त्याला तुमच्या पाठिंब्याची गरज असते. जर तुम्ही त्याला पाठिंबा देऊ नाही शकलात तर याचे उलट परिणाम नात्यावर होण्याची शक्यता असतात.