दातांच्या झिणझिण्यावरील घरगुती उपाय
आजकाल दातांना झिणझिण्या येणे ही समस्या सामान्य झाली आहे. थंड किंवा गरम अन्न खाल्ल्यानंतर बहुतेक लोकांना दातांमध्ये झिणझिण्या येणे ही समस्या उद्भवते. कधीकधी यामुळे झाल्यामुळे अन्न चघळण्यास त्रास होतो. दातांच्या संवेदनशीलतेची कारणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय जाणून घेऊया.
मात्र त्याआधी दातांना झिणझिण्याचे नक्की कारण काय आहे हे समजून घ्यायला हवे. तरच त्यावर उपाय शोधता येतात. दंतचिकित्सक डॉ. हरिश तन्ना यांनी यामागील महत्त्वाची कारणे सांगितली आहेत आणि त्याशिवाय घरी यावर कशा पद्धतीने उपाय करता येतील हेदेखील सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock)
दातांना झिणझिण्या येण्याचे कारण
ज्या लोकांना जास्त गोड पदार्थ खाण्याची आवड असते त्यांना दातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या अनेकदा जाणवू शकते. कारण जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने दातांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते. हीच संवेदनशीलता त्रासदायक ठरते आणि दातांची समस्या अधिक वाढते. याशिवाय आधीच असलेल्या दात किडण्याच्या समस्येमुळेदेखील दातांची संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. जर दात किडत असतील तर डॉक्टरकडे जा आणि उपचार घ्या.
लवंग तेल
लवंग तेलाचा करा उपयोग
दातांच्या कोणत्याही समस्येतून आराम मिळविण्यासाठी आणि झिणझिण्या कमी करण्यासाठी लवंग तेल खूप प्रभावी आहे. लवंग तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरलसह अनेक गुणधर्म असतात, जे दातांच्या संवेदनशीलतेपासून आराम देतात. दातांना लवंगाचे तेल लावल्याने हिरड्याही मजबूत होतात.
रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
नारळाचे तेल
नारळाच्या तेलाने भरा चूळ
दातांची वेदना कमी करण्यासाठी नारळाचे तेलदेखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या तेलाने चूळ भरण्याने दातात येणाऱ्या झिणझिण्यांपासून आराम मिळू शकतो. तुम्ही रोज सकाळी अथवा आठवड्यातून दोन वेळा नारळाच्या तेलाचा वापर करून घेऊ शकता. नारळाच्या तेलाने दात मजबूत होण्यास मदत मिळते.
मीठाचे पाणी
मिठाच्या पाण्याने करा गुळण्या
मीठ आणि पाण्याचे द्रावण दातांना आलेल्या झिणझिण्यादेखील दूर करते. यासाठी, एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि तुम्ही या पाण्याने चूळ भरून दातांच्या समस्या दूर करू शकता. मिठाच्या पाण्याचा वापर तुम्ही नियमित करू शकता. दातदुखीसारख्या समस्या दूर करण्यासाठी मीठाच्या पाण्याचा नियमित वापर करणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते.
पिवळ्या दातांवरील हट्टी Tartar खेचून काढेल देशी जुगाड, 2 मिनिटात चमकतील मोत्यासारखे दात
हळूवारपणे ब्रश करा
ब्रश करण्याची पद्धत ठेवा हळूवार
कधीकधी चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्याने दातांमध्ये मुंग्या येणे देखील होऊ शकते. दातांना येणाऱ्या झिणझिण्या कमी करण्यासाठी, ब्रश करण्याची पद्धत बदला. हळूवारपणे ब्रश करा. दात स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रश वापरा. कडक ब्रशमुळे समस्या निर्माण होऊ शकते. तसंच सॉफ्ट ब्रश निवड आणि त्याचा वापर करा.
डॉक्टरांना भेटा
जर तुम्हाला १ आठवड्याच्या आत घरगुती उपायांनी दातांच्या झिणझिण्यांपासून आराम मिळाला नाही तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा तुम्हाला त्रासदायक आजार होऊ शकतो आणि त्यातून लवकर बरे होण्यासाठी वेळीच उपाय मिळू शकतात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.