खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत? मग नियमित खा 'हे' पौष्टिक पदार्थ, हृद्य राहील हेल्दी
खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
कोणत्या डाळींचा आहारात समावेश करावा?
खराब कोलेस्ट्रॉलची लक्षणे?
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हल्ली तरुण वयातील मुलामुलींना कोणत्याही वयात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येत आहे. हृदयरोगाचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. चुकीच्या वेळी जेवण, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल पुढे जाऊन गंभीर आजारांचे कारण बनते. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, स्ट्रोक इत्यादी गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे आजारांपासून बचाव करण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले अनावश्यक फॅट शरीरासाठी धोक्याचे ठरते.(फोटो सौजन्य – istock)
Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य
शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात हेल्दी फॅट्स तयार करतात तर वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये आवश्यक चरबी जमा करतात, ज्याच्या परिणामामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला चिकट थर रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण करतो, ज्यामुळे शरीरातील अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. व्यवस्थित ऑक्सिजन न मिळाल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या डाळींचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या डाळींचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.
कडधान्यांमध्ये राजम्याची भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये जाऊन चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते.आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा राजम्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. राजम्यामध्ये केवळ फायबरचं नाही तर प्रथिने, लोह आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश करावा.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरवे मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. यामध्ये फायबर आणि विटामिन के मोठ्या प्रमाणावर आढळून येते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी मटार खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी आहारात मटार खावेत. मटारमध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली खराब चरबी बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते.
Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य
प्रत्येक घरात मसूर डाळ अतिशय आवडीने खाल्ली जाते. कारण यामध्ये असलेले घटक सहज विरघळून जातात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. मसूर डाळीमध्ये फायबर आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आहारात मसूर डाळीचे सेवन करावे. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी मसूर डाळ खावी.
Ans: कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तात आढळणारा चरबीयुक्त पदार्थ आहे. हे शरीरातील पेशींच्या भिंती (cell membranes) आणि काही हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Ans: डोळ्यांभोवती पिवळसर चरबी जमा होणे, उच्च कोलेस्टेरॉलची सहसा कोणतीही लक्षणे नसतात
Ans: आहारात फायबर (फळे, भाज्या, ओट्स) वाढवा आणि ट्रान्स फॅट, जंक फूड कमी करा.






