सीताफळ क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी
नैसर्गिक गोडवा असलेले सीताफळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. सीताफळ चवीला अतिशय गोड असतात. हल्ली बाजारतसुद्धा मोठ्या प्रमाणावर सीताफळ उपलब्ध झाले आहेत. सीताफळ खाल्ल्यामुळे तोंडाची बिघडलेली चवही सुधारते. सीताफळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि विटामिन आढळून येते. ज्याचा आरोग्यासह त्वचेलासुद्धा खूप फायदा होतो. सीताफळ हे फळ वर्षातून एकदाच बाजारात येते. या फळाला बाजारात मोठी मागणी आहे. सीताफळ घरी आणल्यानंतर लगेच खालला जातो, कारण हे फळ जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाटीभर सीताफळाच्या गरापासून क्रीम कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी सोपा असून कमीत कमी वेळात तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही सीताफळ क्रीम बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सीताफळ क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टीक मुरमुऱ्यांचे मेदुवडे, वाचा सोपी रेसिपी