दातांना लागलेली काळी कीड नष्ट करण्यासाठी 'या' आयुर्वेदिक पावडरचा करा वापर
दातांचे आरोग्य कायमच निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे, अन्यथा अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात सतत तिखट, तेलकट किंवा अतिगोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांना हानी पोहचण्याची शक्यता असते. तोंडातून दुर्गंधी येणे, दातांमधून रक्त येणे, दातांवर पिवळा थर तयार होणे, हिरड्या कमकुवत होणे किंवा दातांना कीड लागणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. दातांचे आरोग्य खराब झाल्यानंतर बोलताना किंवा हसताना अतिशय लाजिरवण्यासारखे वाटू लागते. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. दात खराब झाल्यानंतर हिरड्यांमध्ये कीड लागण्याची शक्यता असते. कीड लागल्यानंतर अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांना लागलेली कीड नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक पावडर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी ठरेल वरदान, शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून मिळेल सुटका
आयुर्वेदिक डेंटल पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये कडुलिंबाची पावडर आणि लवंग पावडर घेऊन व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात हळद, सैंधव मीठ आणि बेकिंग सोडा घालून पावडर व्यवस्थित तयार करून घ्या. तयार केलेली पावडर बंद झाकण्याचा डब्यात भरून ठेवा. यामुळे पावडर लवकर खराब होणार नाही. तयार केलेल्या पावडरचा वापर तुम्ही दिवसभरातून दोनदा करू शकता. दात घासताना आयुर्वेदिक पावडर बोटांच्या सहाय्याने दातांवर लावून काहीवेळ मसाज करा. त्यानंतर दात स्वच्छ करून गुळण्या करून घ्या. यामुळे दातांना लागलेली कीड नष्ट होईल आणि दात आतून स्वच्छ होतील. कडुलिंबाची पाने आणि लवंग दातांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक दात स्वच्छ करतात.
चहाशिवाय जगू शकत नाही का? 1 मोठी चूक आणि Cancer धोका, वैज्ञानिकांनी दिला इशारा; ३ लक्षणं जीवघेणी
दात स्वच्छ करण्याआधी गुळण्या करून घ्या. याशिवाय आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली पावडर टूथपेस्टसोबत अजिबात वापरू नये. यामुळे दात खराब होण्याची जास्त शक्यता असते. आयुर्वेदिक पावडरचा वापर थेट दातांवर करावा. यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतील. दातांच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी दात आयुर्वेदिक पावडरने घासावे.
दातांच्या पोकळीची लक्षणे?
सुरुवातीला दातावर चाकसारखे पांढरे डाग दिसू शकतात, जे नंतर तपकिरी किंवा काळे होऊ शकतात.दातदुखी किंवा संवेदनशीलता जाणवू शकते.दातांमध्ये गंभीर वेदना होऊ शकतात.
दातांच्या पोकळीवर उपचार:
दात किडलेल्या भागातून बॅक्टेरिया आणि कुजलेले दाताचे भाग काढून टाकला जातो आणि त्या ठिकाणी फिलिंग केली जाते. कंपोझिट रेझिन, पोर्सिलेन किंवा इतर साहित्यांचा वापर केला जातो.