US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक 'Gravity Bomb' ; तेहरानमध्ये घबराट (फोटो सौजन्य : एआय जनरेटेड)
पीट हेगसेथ यांच्या माहितीनुसार, अमेरिकेने युद्धात प्रिसिजन ग्रॅव्हिटी बॉम्बचा वापर करण्याचा विचार केला आहे. यासाठी तयारी सुरु असून लवकरच इराण(Iran) वर महायभंकर हल्ल्याचे संकेत हेगसेथ यांनी दिले आहेत. पेंटागॉनच्या मते, सध्या इराणची यंत्रणा खळखळीत झाली आहे. यामुळे आता महागाड्या मिसाईल्सऐवजी थेट बॉम्बचा वापर अमेरिका करणार आहे.
यासाठी अमेरिकेने आपले सर्वात घातक बॉम्ब बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. हे बॉम्ह जमिनीखालील बंकर आणि लष्करी तळांना अचूकपणे उद्ध्वस्त करुन करण्याची ताकद ठेवतात. याच वेळी दुसरीकडे इराणने देखील इस्रायलयाच्या अणु केंद्रावर डिमोनावर हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळे युद्धाचा धोका अधिक वाढला आहे.
Ans: अमेरिकेने युद्धात सर्वात घातक प्रिसिजन ग्रॅव्हिटी बॉम्बचा वापर करण्याचा विचार केला आहे.
Ans: ग्रॅव्हिटी बॉम्ब हा गुरुत्वाकर्षावर आधारित आहे. उंचावून सोडल्यावर हा बॉम्ब गुरुत्वाकर्षाच्या मदतीने थेट लक्ष्यावर पडतो. याला फ्री फॉल बॉम्ब असेही म्हणतात.






