तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी ठरेल वरदान
दिवसाची सुरुवात निरोगी आणि आनंदी झाल्यास संपूर्ण दिवस उत्साहात जातो. शरीरातील ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या सवयी शरीरावर लगेच परिणाम करतात. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता कायमच पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. अनेकांना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय असते. तांब्याच्या ग्लासात किंवा मोठ्या भांड्यात पाणी भरून ठेवले जाते. त्यानंतर सकाळी उठून अनेकांना उपाशी पोटी पाणी पिण्याची सवय असते. आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्याला विशेष महत्व आहे. तांब्याच्या भांड्याला प्राचीन काळापासून विशेष महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
चहाशिवाय जगू शकत नाही का? 1 मोठी चूक आणि Cancer धोका, वैज्ञानिकांनी दिला इशारा; ३ लक्षणं जीवघेणी
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात तांब्याची भांडी उपलब्ध होती.तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा वापर आरोग्यासाठी केला जात आहे. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. यामध्ये महत्वपूर्ण खनिजे आढळून येतात. योग्य पद्धतीने तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यास तांब्याचे सर्व गुणधर्म पाण्यात उतरतात. त्यामुळे नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.हे पाणी शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरेल. तांब्याचे भांड शरीरात लोहाचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे करते, ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत होते. शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यामधील पाणी प्यावे.
थायरॉइडची समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. शरीरात वाढलेल्या थायरॉइड ग्रंथी कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन सुधारते आणि चयापचय क्रियेचा वेग सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
केसांसाठी प्रभावी:
हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढली आहे. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर वेगेवेगळे उपाय करतात. अशावेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे मेलेनिन तयार होण्यास मदत होते. केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. गॅस आणि अपचनाची समस्या वाढू लागल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
तांब्याच्या पाण्याची मुख्य फायदे:
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सूक्ष्मजंतू आणि दूषित पदार्थ नष्ट करते, ज्यामुळे पाण्यातील रोग पसरवणारे जीवाणू कमी होतात. तांब्याच्या पाण्याची पचनक्रिया सुधारण्यास आणि चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करते.
या लोकांनी तांब्याचे भांड्यातील पाणी पिणे टाळावे:
ज्या व्यक्तींना विशिष्ट आजार आहेत, त्यांनी तांब्याच्या भांड्यात पाणी किंवा अन्न खाणे टाळावे.जास्त तांब्यामुळे पोटदुखी, उलट्या आणि किडनी संबंधित समस्या वाढू शकतात.