मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी 'हे' घरगुती पदार्थ वापरा
सर्वच महिला आणि मुलींना मेकअप करायला खूप आवडतो. मेकअप केल्यानंतर चेहरा अधिक सुंदर आणि उठावदार दिसू लागतो. महिलांच्या मेकअप किटमध्ये अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट असतात. त्यामध्ये मेकअप करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मेकअप ब्रश. मेकअप ब्रश शिवाय मेकअप केला जात नाही. मेकअप अधिक सुंदर आणि फ्लॉलेस होण्यासाठी मेकअप ब्रश आणि स्पन्जचा वापर केला जातो. या टूलच्या मदतीने मेकअप केल्यास तो अधिक काळ चेहऱ्यावर चांगला टिकून राहतो. अधिक काळ एकच मेकअप ब्रश वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेकअप करून झाल्यानंतर मेकअप ब्रश आणि स्पंज स्वच्छ करून घ्यावा. ज्यामुळे पुन्हा वापरण्यासाठी सोपा पडेल. आज आम्ही तुम्हाला मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी गरम पाणी करून त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. त्यानंतर त्यात मेकअपचे सर्व ब्रश आणि स्पंज टाकून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ५ मिनिटांनी हळूहळू मेकअप ब्रशमध्ये अडकलेले सर्व प्रॉडक्ट बाहेर येऊ लागतील. हातांच्या साहाय्याने सर्व मेकअप ब्रश व्यवस्थित चोळून घ्या. त्यानंतर त्यात शँम्पू किंवा कोणतेही क्लिनर टाकून ब्रश पाण्याने स्वच्छ करा. तीन वेळा ब्रश पाण्याने स्वच्छ केल्यानंतर कॉटनच्या कापडात घेऊन त्यातील पाणी पिळून काढा. त्यानंतर काहीवेळ सुकण्यासाठी ठेवा.
सतत वापरलेले मेकअप ब्रश स्वच्छ केले नाहीतर त्वचेवर फोड किंवा मुरूम येण्याची शक्यता असते. त्यामुळे मेकअप करून झाल्यानंतर मेकअप ब्रश स्वच्छ करून घ्यावे. व्हाईट व्हिनेगर नॅचरल जंतुनाशक म्हणून काम करते. त्यामुळे ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सफेद व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी पाण्यामध्ये सफेद रंगाचे व्हिनेगर टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर १० मिनिटं ठेवून पुन्हा एकदा पाण्याने मेकअप ब्रश स्वच्छ करा. यामुळे तुमचे मेकअप ब्रश अधिक काळ चांगले टिकून राहतील.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नारळाचे दूध आणि डिश वॉश लिक्विड या पदार्थांचा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये नारळाचे दूध घेऊन त्यात डिश वॉश लिक्विड टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात मेकअपचे ब्रश आणि स्पंज टाकून काहीवेळ तसेच भिजण्यासाठी ठेवा. मेकअप ब्रश व्यवस्थित भिजल्यानंतर हाताच्या सहाय्याने चोळून व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.