हिवाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर अशी घ्या त्वचेची काळजी
राज्यभरात सगळीकडे थंडी वाढू लागल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानंतर आरोग्यासह त्वचासुद्धा खराब होऊन जाते. या दिवसांमध्ये प्रामुख्याने त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर भेगा पडणे, चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि कोरडी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक प्रकारचे क्रिम्स, लोशन, मॉइश्चरायझर बाजारात उपलब्ध असतात. या क्रीम्स आणि इतर प्रॉडक्टचा महिला मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये अतिप्रमाणात केमिकल प्रॉडक्टचा वापर करू नये.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
चेहरा, हात, पाय इत्यादी ठिकाणी वाढलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंग करतात. पण वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा अधिकच कोरडी पडून जाते. शिवाय त्वचेवर रॅश येतात. हिवाळ्यामध्ये वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा मुलायम आणि सॉफ्ट होण्याऐवजी कोरडी आणि निस्तेज पडते. त्यामुळे वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा जास्त ताणली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. या पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास हातापायांची त्वचा खराब आणि कोरडी होणार नाही.
थंडीच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने गरम पाण्याची अंघोळ केली जाते. पण वॅक्सिंग केल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करू नये. यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेमधील ओलावा आणि नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे हातापायांची त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वॅक्सिंग केल्यानंतर लगेच गरम पाण्याचा वापर हात पाय धुवण्यासाठी करू नये.
हिवाळ्यामध्ये संपूर्ण शरीराला मॉइश्चराइझ लावणे आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये त्वचा जास्त कोरडी आणि रखरखीत होते. त्वचेला मॉइश्चराइझ तुमच्या त्वचेला सूट होईल असेच मॉइश्चराइझ लावावे. यामुळे त्वचा खराब होणार नाही. त्वचेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नियमित मॉइश्चराइझ लावणे आवश्यक आहे. शिवाय तुम्ही मॉइश्चराइझ म्हणून कोरफड जेलचा किंवा कोको बटरचा वापर करू शकता.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेवर स्क्रब करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा मऊ आणि सुंदर होते. मात्र स्क्रब केल्यानंतर त्वचाअधिक सुंदर दिसू लागेल.