Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vitamin B12: सतत थकवा जाणवतोय? असू शकतं Vitamin B12 च्या कमतरतेचे संकेत; जाणून घ्या लक्षणे

Vitamin B12 Deficiency Symptoms: शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास कोणती लक्षणे दिसतात, तसेच हे वेळीच कसे ओळखावे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 06:05 PM
Vitamin B12: सतत थकवा जाणवतोय? असू शकतं Vitamin B12 च्या कमतरतेचे संकेत; जाणून घ्या लक्षणे
Follow Us
Follow Us:
  • व्हिटॅमिन B12 ची कमतरता?
  • शरीर देत हे संकेत
  • व्हिटॅमिन B12 ची कमतरता का होते?
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण थकवा, कमजोरी किंवा सततचा अशक्तपणा याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही लक्षणे शरीरात व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची संकेत असू शकतात. व्हिटॅमिन B12, ज्याला कोबालामिन असेही म्हटले जाते, हे शरीरातील नसांचे आरोग्य, रक्तनिर्मिती आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्हिटॅमिनची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास शरीर वेळोवेळी संकेत देत असते. हे संकेत वेळेत ओळखणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन वेळीच सुधारणा केली जाऊ शकते. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

Thyroid: थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी

सतत थकवा आणि कमजोरी जाणवणे

व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास शरीरात लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि सतत थकवा, अशक्तपणा व ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू लागते.

हात-पायात मुंग्या येणे

हात किंवा पायांमध्ये वारंवार मुंग्या येणे, सुन्नपणा जाणवणे हे B12 कमतरतेचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. ही समस्या नसांवर होणाऱ्या परिणामामुळे उद्भवते.

त्वचा पिवळसर दिसणे

शरीरात B12 कमी झाल्यास त्वचेचा रंग फिकट पडू शकतो. काही लोकांमध्ये त्वचा आणि डोळे पिवळसर दिसू लागतात. हे अ‍ॅनिमियाचेही लक्षण असू शकते.

लक्ष केंद्रित करण्यात अडचण

व्हिटॅमिन B12 ची कमतरता मेंदूच्या कार्यावरही परिणाम करू शकते. त्यामुळे विस्मरण, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, गोंधळ किंवा मूड स्विंग्स यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

दम लागणे आणि चक्कर येणे

जिन्यावर चढताना किंवा थोडे चालल्यानंतरही दम लागणे, चक्कर येणे किंवा हृदयाची धडधड वाढणे हीदेखील B12 च्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.

जीभ लाल होणे आणि अल्सर

व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास जीभ लाल, सूजलेली किंवा दुखत असल्यासारखी वाटू शकते. काही लोकांना तोंडात वारंवार अल्सरची समस्या देखील होऊ शकते.

व्हिटॅमिन B12 ची कमतरता का होते?

शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये B12 ची कमतरता अधिक आढळते, कारण हे व्हिटॅमिन प्रामुख्याने दूध, अंडी, मासे आणि मांस यांसारख्या पदार्थांमध्ये आढळते. याशिवाय पचनासंबंधित समस्या, वाढते वय किंवा काही औषधांमुळेही शरीरात B12 कमी होऊ शकते.

कमतरता टाळण्यासाठी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार घेणे आणि गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे. दूध, दही, चीज, अंडी आणि फोर्टिफाइड फूड्सचा आहारात समावेश केल्यास B12 ची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते. जर सतत थकवा किंवा वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर वेळेत रक्त तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Jaggery: एकेकाळी गरीबांचा गूळ, आज आरोग्याचा ‘सुपरफूड’; बाजारात साखर पडली फिकी

Web Title: Vitamin b12 deficiency symptoms causes treatment health guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • vitamin b12
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
1

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
2

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
3

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
4

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.