वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिनाभर फॉलो करा सोप्या टिप्स
वाढलेले वजन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. पोटावर अतिरिक्त चरबी वाढणे, लठ्ठपणा, चालताना लगेच शरीर थकणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पोटावर अतिरिक्त चरबी वाढल्यानंतर कपड्यांमधून पोटावर वाढलेली चरबी दिसू लागते. यामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. वजन वाढण्यामागे अनेक कारण आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सतत जंक फूडचे सेवन, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. मात्र शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे अनेक आजार वाढण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्यानंतर ती कमी करण्यासाठी अनेक लोक आहारतज्ञांकडून डाईट घेणे, तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, सकाळच्या वेळी नाश्ता न करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र हे उपाय करूनसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास महिन्याभरात पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर हळूहळू कमी होऊ लागतो. नियमित 8 ते 10 ग्लास पाणी प्यायामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि पोट हळूहळू कमी होते.
वजन कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठून व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच घरच्या घरी तुम्ही पोटाचे कोणतेही व्यायाम करू शकता. यामुळे वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सायकलिंग सुद्धा करतात.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात सकस आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. आहारात हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन, प्रथिने आणि कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शिवाय जेवणात मीठ, साखर, तेल कमी प्रमाणात वापरा.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात मानसिक तणाव वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे वजन वाढू लागते. त्यामुळे मानसिक तणाव कमी करणे. तणाव वाढल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.