आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय
निरोगी आरोग्यासाठी पचनक्रिया निरोगी असणे फार गरजेचे आहे. अन्यथा शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात होणारे बदल, जंक फूडचे सेवन, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा वाईट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या योग्य सवयी फॉलो करून आरोग्य जगणे आवश्यक आहे. आहारात बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडू लागते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारणे आवश्यक आहे. अशावेळी आहारात गूळ आणि ओव्याचे सेवन करावे. या दोन पदार्थांमध्ये अनेक शक्तिशाली गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
गुळामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. शिवाय लोह, आणि अनेक पोषणतत्त्वे आढळून येतात. तर ओवा खाल्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅस झाल्यास ओवा आणि कोमट पाण्याचे सेवन करावे. तसेच यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया ओवा आणि गूळ हे पदार्थ एकत्र खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात.
बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी दैनंदिन आहारात गूळ आणि ओव्याचे सेवन करावे. यामुळे पचनशक्ती निरोगी राहते आणि पोटासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. गुळाचे सेवन केल्यामुळे अन्नपचन होण्यास मदत होते. गॅस, अपचन, आणि पोटदुखी कमी करण्यासाठी ओवा खाऊन वरून कोमट पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष देण्यास मिळत नाही. अशांना बद्धकोष्ठतेचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवू लागतो. त्यामुळे दैनंदिन आहारात बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी गूळ आणि ओव्याचे सेवन करावे. शिवाय यामुळे आतड्यांचे कार्य निरोगी आणि मजबूतर राहते. मलप्रवृत्ती नियमित होते ज्यामुळे अपचन किंवा कोणत्याही पोटासंबंधित समस्या दूर होते.
शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी गूळ अतिशय फायदेशीर आहे., नियमित गुळाचे सेवन केल्यास रक्तामधील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होईल. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होऊन जाते. ओवा शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी आहे.यामुळे कोणत्याही समस्या उद्भवत नाही.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मूळव्याधीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी बियांची गूळ आणि ओव्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांवरील दबाव कमी होऊन आराम मिळतो. ओव्याचे सेवन केल्यामुळे सूज कमी होऊन वेदना कमी होतात. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास काही दिवसांमध्ये मूळव्याधीची समस्या पुन्हा उद्भवत नाही.