फोटो सौजन्य - Social Media
पावसाच्या दिवसांमध्ये वादळ, ढगफुटी, पूर तसेच इतर काही परिस्थिती येणे फार काही नवल नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? अशी ही एक परिस्थिती आहे, ज्यामध्ये जलाशयाचे पाणी गोल-गोल फिरत वर आकाशात जाते. दुरून पाहताना अक्षरशः चक्रीवादळाचा भास देणाऱ्या या परिस्थितीला ‘वावटळ’ असे म्हणतात. ही स्थिती काही जास्त दुर्मिळ नाही. खोल समुद्रात किंवा इतर मोठ्या जलाशयांमध्ये या गोष्टी घडणे फार नवीन नाही. वावटळासंदर्भात अधिक माहिती:
वावटळाला ‘Waterspout’ म्हणून ओळखले जाते. फिरणारे वादळी वारे पाण्याच्या पृष्ठभागावरून आकाशाकडे फिरत्या रेषेत जातात, त्याचसोबत पाणीही फिरत्या रेषेत वर जाते, तेव्हा वावटळ तयार होते. उष्णता आणि आद्रता यामुळे हे वावटळ तयार होतात. समुद्र किंवा सरोवराचे पाणी गरम असल्यास, त्या भागातील हवा देखील गरम आणि आर्द्र होते. वर थंड आणि खालून गरम हवा एकत्र येते. गरम हवा वर जाताना तिच्यात एक चक्रीगती निर्माण होते. वाफयुक्त गरम हवा वर जाताना त्या भोवती वाऱ्याचे चक्र तयार होते आणि त्याच वेळी वाऱ्याच्या दिशेतील बदलामुळे ती फिरती रचना आकाशाकडे वळते. या फिरत्या हवेचा वेग वाढल्यास, पाण्याच्या पृष्ठभागावरून वाफेच्या स्वरूपात पाणी वर ओढले जाते आणि एक उभी वावटळ तयार होते.
वावटळीचे ही असतात प्रकार
वावटळ साधारणतः १५ ते २० मिनिटे टिकते. पण जर वावटळ किनार्याच्या दिशेने आली तर मोठी हानी होऊ शकते. पण मुख्यतः, ही खोल भागात तयार होते आणि याचा धोका मच्छिमारांना असतो. पाण्याच्या वावटळ्या म्हणजे पाण्यावर तयार होणाऱ्या चक्री वाऱ्याच्या गतीमुळे बनणाऱ्या वाफेच्या उभ्या वादळांसारख्या रचना आहेत. त्या नैसर्गिक असून, उष्णता, आर्द्रता आणि हवेच्या गतीमुळे तयार होतात.