फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही हॉरर सिनेमांचे शौकीन असाल, तर तुम्ही ‘अॅनाबेल’ या बाहुलीबद्दल नक्कीच ऐकले असेल. हॉलीवूडच्या प्रसिद्ध The Conjuring Universe मालिकेतील अॅनाबेलवर आधारित चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: थरकापून सोडले आहे. पण ही अॅनाबेल डॉल खरी आहे का? ती कुठून आली? तिच्यामागची खरी कहाणी काय आहे? याची माहिती अनेकांना ठाऊक नाही. अॅनाबेल ही एक Raggedy Ann नावाची साधी कपड्यांची बाहुली आहे. रेगेडी अॅन हे मूळतः एक बालपात्र आहे, जे लेखक जॉनी युएल यांनी तयार केले होते. ही बाहुली दिसायला साधी आहे, लाल धाग्यांचे केस, त्रिकोणी नाक आणि मोठे डोळे. मात्र 1970 मध्ये ही साधी वाटणारी बाहुली एक नर्सिंग स्टुडंटला गिफ्ट म्हणून मिळाल्यानंतर, तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या विचित्र घटना सुरू झाल्या.
त्या नर्स आणि तिच्या मैत्रिणीने अनुभवले की ही डॉल घरात स्वतःहून एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते. कधी नोट्स मिळायच्या, ज्यावर “Help Me” किंवा “Annabelle” असे लिहिलेले असायचे. काही वेळा त्या दोघींना शरीरावर अचानक ओरखडे, दुखणं किंवा थंडी जाणवायची. एकदा तर डॉलने मैत्रिणीवर हल्ला केला होता, ज्यामुळे तिला खरंच इजा झाली.
या सगळ्या घटनांमुळे त्या दोघींनी प्रसिद्ध पॅरानॉर्मल शोधक एड आणि लोरेन वॉरेन यांच्याशी संपर्क साधला. तपासणीनंतर त्यांनी सांगितले की ही डॉल एका वाईट आत्म्याने पजेस्ड आहे आणि ती आत्मा ‘अॅनाबेल’ नावाच्या मृत मुलीचा आहे. त्यांनी ही डॉल त्यांच्या मोनरो, कनेक्टिकट येथील ओक्युल्ट म्युझियम मध्ये एका काचेच्या बॉक्समध्ये बंद करून ठेवली.
या म्युझियममध्ये Horror वस्तू ठेवण्यात आल्या होत्या आणि अॅनाबेल डॉल ही सर्वात जास्त प्रसिद्ध व भयानक मानली जात होती. मात्र, झोनिंग कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे म्युझियम बंद करण्यात आले. अॅनाबेल डॉलला एका गुप्त आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, ज्याचे स्थान अजूनही सार्वजनिकरित्या उघड केलेले नाही. आजही ही डॉल एक गूढ आणि भीतीदायक रहस्य म्हणून ओळखली जाते. तिच्यावर आधारित चित्रपट लोकांच्या मनात भिती निर्माण करतात, पण तिच्यामागची खरी गोष्ट अनेक पटींनी अधिक भयावह आहे.