फोटो सौजन्य: iStock
केळी हे एक पोषणयुक्त आणि सहज पचणारे फळ मानले जाते. हे त्वरित ऊर्जा प्रदान करते आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. मात्र, काही विशिष्ट पदार्थांसोबत केळी खाल्ल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळे गॅस, ऍसिडिटी, ऍलर्जी आणि पचनासंबंधी इतर त्रास उद्भवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांनीही यासंबंधी सतर्कतेचा सल्ला दिला आहे. चला जाणून घेऊया, केळीसोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे आणि त्याचे कारण काय आहे.
बहुतांश लोक केळी आणि दूध एकत्र सेवन करतात, परंतु आयुर्वेदानुसार हे अपायकारक ठरू शकते. दोन्ही एकत्र घेतल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात, ज्यामुळे खोकला, ऍलर्जी आणि त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, पचन मंदावल्यामुळे शरीर जडसर वाटते आणि आळस वाढतो.
१० मिनिटांमध्ये संध्याकाळच्या जेवणात बनवा आंबट गोड कैरीची डाळ, जेवणात जातील चार घास जास्त
दही आणि केळी या दोन्ही पदार्थांमध्ये थंडावा असतो. त्यांना एकत्र खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि कफ वाढण्याची शक्यता असते. यामुळे सर्दी, घसा खवखवणे आणि अपचन यासारखे त्रास उद्भवू शकतात.
टरबूजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते, तर केळीमध्ये फायबर आणि नैसर्गिक साखर असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्याने पचनसंस्थेत असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे गॅस, जडपणा आणि ऍसिडिटी होण्याची शक्यता असते.
बटाट्यामध्ये आणि केळीत स्टार्चचे प्रमाण जास्त असते. हे एकत्र सेवन केल्याने पचनसंस्था मंदावते आणि पोटफुगी, गॅस तसेच वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
संत्री, लिंबू यांसारख्या आम्लयुक्त फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. केळीसोबत ही फळे खाल्ल्यास पचन संस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि ऍसिडिटी, पोट जळजळ आणि अपचन होण्याचा धोका असतो.
केळी आणि उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की मांस किंवा मासे एकत्र खाल्ल्यास पचनसंस्था कमजोर होते. त्यामुळे पोट जड होते आणि आळस जाणवतो.
– केळी एकटीच खाणे अधिक फायदेशीर आहे.
– ओट्स, अक्रोड किंवा इतर हलक्या पदार्थांसोबत केळी सेवन करावे.
– केळी खाल्ल्यानंतर जड जेवण टाळावे.
– जर केळी दूध किंवा दह्यासोबत घ्यायची असेल, तर ती स्मूदीच्या स्वरूपात संतुलित प्रमाणात घ्या.
योग्य प्रकारे केळी सेवन केल्यास ते आरोग्यास अधिक लाभदायक ठरते!