१० मिनिटांमध्ये संध्याकाळच्या जेवणात बनवा आंबट गोड कैरीची डाळ
उन्हाळा ऋतू सुरु झाल्यानंतर सगळ्यांचं कैरी खाण्याची इच्छा होते. कच्च्या कैरीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला आंबट गोड असलेली कैरी लहान मुलांपासून अगदी मोठेसुद्धा आवडीने खातात. याशिवाय कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मुरांबा, कैरीची चटणी, कैरीचे लोणचं इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. कारण उन्हामध्ये बाहेर फिरल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशावेळी नारळ पाणी, ताक, दही, कोल्ड्रिंक इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. संध्याकाळच्या जेवणात नेहमी नेहमी काय बनवावं, हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही आंबट गोड कैरीची डाळ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कैरीची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा इडलीचे चविष्ट चाट, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश