फोटो सौजन्य - Social Media
वेदांचे अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुक्राचार्य हे नाव नक्कीच माहीत असेल. सप्तर्षीमधील मानाचे नाव असणारे ‘भृदू’ यांचे पुत्र शुक्र! शुक्रांच्या अगोदर बृहस्पती या नावाबद्दलदेखील जाणून घेणे आवश्यक आहे. बृहस्पती आणि शुक्र पाहायला गेले तर दोघेही एकाचे वयाचे! दोघांचे एकाच गुरुकुलात शिक्षण झाले, पण शुक्र ज्या गुरुकुलात शिक्षण घेत होता त्या गुरुकुलाची गुरूंचे पुत्र म्हणजे ‘बृहस्पती’. त्यामुळे बृहस्पती आणि शुक्र या दोघांमध्ये नेहमीच भेदभाव होत असे. शुक्राचा मान शुक्राला मिळत नसे कारण शुक्र हा बृहस्पतीपेक्षा सर्वगुणसंपन्न होता पण त्याला नेहमी बृहस्पतीनंतरची वागणूक दिली गेली. त्यामुळे शुक्र नेहमी अपमानित भावना बाळगून होता. शेवटी त्याने गुरुकुलच सोडून दिले.
पुढे, दुसऱ्या गुरुकुलातून सर्वगुण शिक्षण तसेच कौशल्य मिळवत शुक्र स्वर्गात रवाना होतात. तिथे पाहतात तर काय? बृहस्पतीही तिथे उपस्थित असतात. देवगुरु होणार कोण? याची परीक्षा सुरु असते पण इंद्र आणि बृहस्पती यांची खास मैत्री असते त्यामुळे इंद्र पक्षपातीपणा करून येथेही बहृस्पतीलाच निवडतो आणि योग्यता असून शुक्रांना त्यांची जागा मिळत नाही, उलट देवसभेत इंद्र त्यांना तुच्छ शब्दात हिणवतो. शुक्रांना हा राग सहन होत नाही, शुक्र रागारागात पाताळलोकात जातात. पाताळलोकात असुरांचे साम्राज्य असते आणि शुक्रांची आई स्वतः दैत्य असते त्यामुळे त्यांना इंद्रही हिणवतो. या रागामुळे दैत्य राज्यात पोहचलेले शुक्रांना दैत्यांकडून मानवंदना मिळते. जो मान देवांनी दिला नाही तो मान असुरांनी अगदी शुक्रांचे पाताळात पाऊल पडताच दिला त्यामुळे शुक्र आता दैत्यांचे गुरु होण्याचे ठरवतात आणि देवांच्या विरोधात जाण्याचा पण घेतात.
सगळे असुरही त्यांना आपले गुरु मानतात आणि गुरूच्या पदी विराजमान करतात. त्या घटनेपासून शुक्र “दैत्यगुरू शुक्राचार्य” या नावाने ओळखले जातात. त्यांच्या गुरुकुलात समस्त असुर साम्रज्य वाढतं. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, प्रल्हाद तसेच बळीसारखे असुर शुक्राचार्यांच्याच सानिध्यात आपल्या राज्याचा विस्तार करतात.






