फोटो सौजन्य: Freepik
भारतात नेहमीपासूनच लग्नाला एका पवित्र व धार्मिक काय मानले गेले आहे. भारत हा एका पारंपरिक देश आहे. त्यामुळेच आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तींचे एकत्र येणे नसून एका सोहळा असतो. पूर्वी लग्न म्हणजे एका प्रकारचा विश्वास होता, जिथे नवरी मुलगी नवरा मुलावर विश्वास ठेऊन गृह प्रवेश करायची व वर्षोनुवर्षे दोघे आपला संसाराला हातभार लावायचे.
भारतीय संस्कृतीत आपण नेहमी ऐकतो की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळून येत असतात, जे खरंच आपल्याकडे लग्न किती पवित्र आहे हे अधोरेखित करून देते. पण आज याच लग्नातल्या गाठी अस्सल आयुष्यात तुटत आहे. एके काळी जिथे 30-40 वर्षांचा सुखाचा संसार चालायचा तोच आज एक दोन वर्षात मोडत आहे. यामागचे कारण आपल्यासाठी जाणून घेणे महत्वाचे आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पती-पत्नीमध्ये हवा तसा संवादच होत नाही. जर पती-पत्नी दोघेही ऑफिसात कामं करत असेल आणि दोघांची वेळ ही वेगळी असेल, तर भावनिक अंतर वाढते, जे कधीकधी गैरसमजाचे कारण बनते. अशा परिस्थितीत घटस्फोट घेणे आश्चर्यकारक नाही.
पूर्वी घटस्फोट हा एक वाईट डाग मानला जात होता. तसेच यावर लोकं काय म्हणतील असा विचार कित्येकांच्या मनात येत होता. त्यामुळे पूर्वी घटस्फोटाचा निर्णय घेणे कोणालाही सोपे नव्हते, परंतु हळूहळू त्याला समाजात मान्यता मिळत आहे. आता लग्न मोडणे इतके विचित्र राहिलेले नाही, विशेषतः शहरी भागात.
गेल्या काही दशकांमध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनण्याची संधी मिळाली आहे. आज प्रत्येक तरुणी तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते. पूर्वी मुलींना मर्जीशिवाय त्याचे लग्न केले जायचे पण आज ही स्तिथी पूर्णपणे बदलली आहे. जेव्हा त्यांना लग्नानंतर सुद्धा घुसमटल्यासारखे वाटते, तेव्हा त्या स्वतःच्या निर्णयाने घटस्फोट घेतात.
आजकाल अनेकदा असे दिसून येते की पती-पत्नी दोघांनाही अहंकार म्हणजेच इगोचा त्रास जास्त असतो. एक व्यक्ती रागावलेली असेल आणि दुसरी शांत राहून त्याचा राग समंजसपणे हाताळाळते तेव्हाच नातं टिकतं. अहंकारामुळे जर नवरा बायको पुन्हा पुन्हा शत्रूसारखे भांडत असेल तर लग्न टिकणार नाही हे उघड आहे.
पूर्वीच्या काळी, लग्न हे सहसा आई-वडील आणि कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईक ठरवत असत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कलह झाला तर लग्न वाचवण्याची जबाबदारी त्यांची होती. आजच्या युगात पूर्वीपेक्षा जास्त प्रेमविवाह होत आहेत. प्रेमविवाहाबाबत तरुणांची जी स्वप्ने असतात ती अनेकदा लग्नानंतर भंगली जातात. अशा परिस्थितीत, ते स्वतः घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात.






