सुंदर ओठांसाठी खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा हे पदार्थ
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा कोरडी आणि रुक्ष पडून जाते. त्वचेची गुणवत्ता खराब होण्यास सुरुवात होते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती पुन्हा सुधारणे अवघड होऊन जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ओठांची योग्य ती काळजी घ्यावी. थंडीमध्ये ओठ खराब होऊन जातात. ओठांची त्वचा कोरडी पडणे, ओठ काळे होणे, ओठांना भेगा पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. ओठांचा रंग जास्तच काळा झाल्यानंतर अनेकांना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. तसेच अनेक महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ओठांची योग्य ती काळजी घ्यावी. ओठांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला ओठांची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मागील अनेक वर्षांपासून खोबरेल तेलाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. शिवाय साखर हा पदार्थ नैसर्गिक स्क्रबर आहे. ज्यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठांची त्वचा मऊ आणि गुलाबी होते. नारळाचे तेल ओठांना मॉइश्चराईज करते ज्यामुळे ओठ गुलाबी आणि मऊ होतात. नारळाच्या तेलात साखर मिक्स करून लावावी. ज्यामुळे ओठ नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होतात.
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. लिंबाच्या रसात आढळून येणारे गुणधर्म त्वचेवर मृत त्वचा कायमची काढून टाकतात. शिवाय नैसर्गिक ब्लिच म्हणून लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. लिंबाच्या रसात नारळाचे तेल टाकून मिक्स करून घ्यावे. तयार केलेले मिश्रण ओठांवर रात्री लावून सकाळी ओठ पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे ओठांचे सौंदर्य वाढेल.
खराब झालेला ओठांचा रंग सुधारण्यासाठी मधाचा वापर करावा. मधामध्ये आढळून येणारे गुणधर्म त्वचेवर डेड स्किन काढून त्वचा उजळ्वण्याचे काम करतात. वाटीमध्ये अर्धा चमचा साखर, मध आणि खोबऱ्याचे तेल मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमचे ओठ चमकदार आणि सुंदर दिसतील.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात उपाशी पोटी ग्रीन टी चे सेवन करावे. तसेच यामुळे ओठांवरील काळेपणा कमी होतो. ग्रीन टी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर तयार पाणी ओठांना लावा नंतर वरून खोबऱ्याचे तेल लावा.