फोटो सौजन्य - Social Media
डबल डेटिंग म्हणजे काय? डबल डेटिंग म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त जणांसोबत भावनिक नात्यात किंवा शारीरिक नात्यात किंवा फक्त नात्यात राहणे असे असते. डबल डेटिंग करण्याचे अनेक कारणे असतात पण असे केल्याने त्या व्यक्तीच्या चरित्रावरही प्रश्नचिन्हही उभा राहू शकतो. लग्नाच्या अगोदर असू द्या किंवा लग्नाच्या नंतर, दहा जणांसोबत नातं ठेवण्यापेक्षा एकाशीच नातं ठेवणे म्हणजे खरं प्रेम आणि खरं नातं! नाही तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही.
डबल डेटिंग म्हणजे काय?
आताच्या काळात डबल डेटिंग हा प्रकार फार वाढला आहे. मुलं आणि मुली, दोन्ही या गोष्टीकडे वळले आहेत. मुलं शारीरिक आकर्षणामुळे डबल डेटिंग करत आहेत आणि मुली भावनिक आधार म्हणून डबल डेटिंग करतात. डबल डेटिंग म्हणजे काय तर एका व्यक्तीशी दिवसभर चॅट करणे, भावनात्मक आधार घेणे आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत गावभर फिरणे आणि तिसऱ्या सोबत इतर संबंध ठेवणे.
निष्कर्षणार्थ, डबल डेटिंग म्हणजे तुमच्या सर्व जोडीदारांना एकप्रकारे फसवण्यासारखेच असते. कारण जेव्हा तुम्ही आधीच एका व्यक्तीसोबत जोडलेले असता आणि त्यात तुम्ही जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर जुळवून घेता तेव्हा तो दुसरा व्यक्तीही भावनात्मक रूपात तुमच्यात गुंतत जातो. त्याला हे माहीत नसतं की तुम्ही आधीच एका नात्यात आहात त्यामुळे त्याचा क्षणोक्षणी विश्वासघात होत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीला तुमच्या या सत्याची जाणीव होते तेव्हा त्या व्यक्तीचा प्रेम या शब्दावरूनच विश्वास उडून जातो. कारण त्या व्यक्तीने तुम्हाला त्याच सगळं काही दिलं असतं, अर्थात तुम्हीही त्या व्यक्तीला सगळं काही देता पण त्याचवेळी त्या गोष्टी तुम्ही इतरांनाही देत असता, तिथे चुकतं.
जर तुम्ही तुमच्या जुन्या नात्याला कंटाळून नवीन जणांशी जुळवून घेत आहात तर आधी जुन्या नात्याचा सोक्षमोक्ष लावा. नवीन नात्याला जुन्या नात्याविषयी कळू द्या, कारण नंतर या गोष्टी माहिती पडून विश्वासघात होण्यापेक्षा, त्या आधीच माहीत असलेल्या कधीही बऱ्या. पण एक मात्र खरं, एखादं नातं तोडताना किंवा त्यात बदल करताना, तुमच्या जोडीदाराशी आधी संवाद साधा. कारण भावनात्मक गोष्टी माणसाचं आयुष्यही उध्वस्तही करू शकतात. त्यामुळे तुमचे डबल डेटिंग करणं कुणाचं तरी आयुष्य उध्वस्त करून लावेल याची जाण असू द्या. चुकी तुमची असो वा जोडीदाराची, योग्य ते सत्य सांगूनच सोक्षमोक्ष करा. एकमेकांची जीवापार काळजी घेणारे दोन जीव एका भांडणानंतर कायमचे दूर होऊन एकमेकांचे द्वेष करू लागतील हे चित्र फार भयावह असते. नवीन नात्यात आल्यावर जुन्या नात्याच्या भावना जपणे शक्यतो टाळा कारण याने तुमचे नवीन नातेही बिघडेल.
मुलं की मुली? कोण जास्त डबल डेटिंग करतं?
मुलं डबल देत करतात तेव्हा दिसून येतं पण मुली अतिशय स्मार्ट पद्धतीने डबल डेट करतात. कदाचित डबल डेट करताना मुलींचा हेतू वाईट नसेल. जसं की मनात असलेल्या गोंधळामुळे ते डबल डेटिंगमध्ये अडकतात. पण यामुळे तिचे सगळे जोडीदार तिच्यात गुंतून जातात आणि त्यांचाही सतत विश्वासघात होत असतो. डबल डेट करणाऱ्या मुली खरं प्रेम ओळखायला चुकतात आणि जेव्हा त्या दुसऱ्या कुणासाठी तर त्यांच्यावर जिवापार प्रेम करणाऱ्या, त्यांची अगदी लहान बाळासारखी काळजी घेणाऱ्या व्यक्तीसाठी सोडून टाकतात तेव्हा तो व्यक्ती पूर्णपणे तुटून जातो पण अशा डबल डेटिंग करणाऱ्या मुलींना त्या गोष्टीची काहीच पडलेली नसते किंवा नात्याचा प्रेशर असतो.
जेव्हा मुलं डबल डेटिंग करतात, तेव्हा त्या गोष्टी दिसून येतात. मुळात, मुलं शारीरिक गरजा भागवण्यासाठी डबल डेट करतात. अनेकदा “एक जमलं नाही तर दुसरी आहे” असा बॅकअप विचार त्यांच्या मनात असतो. तसेच कधीकधी त्यांची कमिटमेंट टाळण्याची मानसिकता नसल्यामुळे ते डबल डेटिंग करतात.
काहीही असो, डबल डेटिंग हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. जर तुम्ही करत असाल आणि अशात तुमचा एखादा जोडीदार तुमच्यावर खरंच प्रेम करत असेल तर त्याला हा मागे लागलाय म्हणून हाडतूड करण्यापेक्षा त्याच्या प्रेमाचा आणि काळजीचा आदर करा, कारण आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येकवेळी आपल्या आयुष्यात येत नाही. ती गेली तर गेलीच! त्यामुळे, अशी व्यक्ती आयुष्यात आली असेल आणि त्याच्यासोबत तुमचे आयुष्य जरा तरी घडेल असे वाटत असेल तर त्या व्यक्तीची कदर करा आणि इतर जोडीदारांशी नाते तोडताना त्या जोडीदारांनाही सत्याची अनुभूती होऊद्या. कदाचित त्यांनीही तुमच्यावर प्रेम केले असेल, त्याचाही आदर बाळगा.






