जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध असतात. त्यात आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे लसूण पात. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. लसूणची फोडणी दिल्यानंतर पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. त्यामुळे जेवणात लसुणचा वापर करावा. लसूण खाल्ल्यामुळे रक्तात जमा झालेली वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. यामध्ये असलेले गुणकारी घटक पांढऱ्या रक्त पेशींना उत्तेजित करून संसर्ग आणि फ्लूशी लढण्यास मदत करतात. याशिवाय शरीरात जमा झालेली विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लसूण खावा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कच्चा लसूण खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारेल आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया निर्माण होतील. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये ताजी लसूण पात उपलब्ध असते. त्यामुळे त्याची भाजी किंवा इतर कोणताही पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते, पांढऱ्या रक्त पेशींना उत्तेजित करून संसर्ग आणि फ्लूशी लढण्यास मिळते. चला तर जाणून घेऊया लसूण पातीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’






