आज जागतिक सायकल दिनानिमित्त (World Bicycle Day 2022) सगळीकडे सायकलबाबत चर्चा सुरु आहे. सायकलचे महत्त्व आणि सायकल वापरल्याने आरोग्याला होणारे (Benefits For Health From Bicycle) फायदे सांगितले जात आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत जी तुम्हाला माहिती नसेल.
[read_also content=”नांदेडमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/four-members-of-the-same-family-die-in-a-car-and-truck-accident-in-nanded-nrps-288473.html”]
पंतप्रधानही वापरतात सायकल
जगात सगळीकडे लोक गाड्या खरेदीच्या मागे असताना सायकल सध्या खूप कमी वापरली जाते. अशा खूप कमी जागा आहेत जिथे सायकल चालवली जाते. मात्र जगात असाही एक देश आहे जिथे आजही सायकल मोठ्या प्रमाणात चालवली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या देशात पंतप्रधानसुद्धा आपल्या घरापासून संसदेपर्यंत सायकलने जातात. या देशात गाड्यांपेक्षाही जास्त सायकल चालवण्याची क्रेझ आहे.
सायकल चालवणे हा जन्मसिद्ध अधिकार
सायकल पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. मात्र लोकांना सायकल चालवण्याची खूपदा लाज वाटते. मात्र नेदरलँड्स हा एक असा देश आहे जिथे रस्त्यावर सगळीकडे सायकल्सच दिसतील. नेदरलँड्समध्ये सायकल चालवणाऱ्यांना पहिला अधिकार आहे. नेदरलँड्समध्ये सायकल इतकी लोकप्रिय आहे की, इथले पंतप्रधानसुद्धा सायकलने ऑफीसमध्ये जातात.
नेदरलँड्सची राजधानी ॲमस्टरडॅममध्ये सायकल चालवणाऱ्यांसाठी खास लेन आहे. फक्त राजधानीतच नाहीतर संपूर्ण देशात सायकलची एक संस्कृती आहे. या देशातले लोक सायकल चालवणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार मानतात. खूप आनंदाने सायकल चालवतात.
आजही नेदरलँड्समध्ये सायकलची क्रेझ आहे. गाड्यांची संख्या वाढली तरी सायकलचा वापर कमी होऊ नये, याविषयी इथले लोक सजग आहेत. इथे लोक सायकलचाच जास्त वापर करतात.